Pune Bribery Case: पुण्यात वन विभागातील कर्मचाऱ्याला 4 लाखांची लाच घेताना अटक

सातबारा उताऱ्यावरील वनक्षेत्राचे शेरे काढण्यासाठी लाच मागणाऱ्या सर्व्हेक्षकावर एसीबीची कारवाई
Bribe Case
Bribe Case
Published on
Updated on

पुणे: जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील वनक्षेत्राचे शेरे काढून टाकण्यासाठी एकाकडून चार लाख रुपयांची लाच घेणाऱ्या वन विभागातील वनक्षेत्र सर्व्हेक्षकास (मोजणी कर्मचारी) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रांगेहाथ पकडले. अरण्येश्वर परिसरात ही कारवाई केली. उदयसिंग भीमराव कुंभार (वय 46, सध्या रा. कात्रज, मूळ रा. सातारा) असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी कुंभारविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Bribe Case
Pune Vegetable Market: पुणे बाजारात मटारचे दर वाढले; आवक घटली

एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे जमीन खरेदी-विक्री व्यवसाय करतात. वडगाव मावळ तालुक्यातील चिखलसेगाव, आपटी, कुणेनामा या गावात तक्रारदाराने जमीन खरेदी केली आहे. काही जमिनींच्या सातबारा उताऱ्यावर खासगी वनाचे शेरे लागले होते.

Bribe Case
Pune Fruit Market: पुण्यात संत्र्याचे भाव वाढले; मोसंबीचे दर घसरले

हे शेरे काढून टाकण्यासाठी त्यांनी महसूल विभागाकडून आदेश मिळवून त्याबाबतच्या नोंदी वन विभागाच्या कागदपत्रांवर घेण्यासाठी अर्ज दिला होता. याबाबतची प्रत मिळविण्याकरिता त्यांनी सेनापती बापट रस्त्यावरील उपवनसंरक्षक कार्यालयात अर्ज केला होता. या अर्जाच्या चौकशीसाठी ते वन विभागाच्या कार्यालयात गेले. हे काम वनक्षेत्र मोजणी कर्मचारी उदयसिंग कुंभार यांच्याकडे असल्याची माहिती त्यांना मिळाली.

Bribe Case
Chakan Market Prices: चाकण बाजारात कांद्याचे दर घसरले; आवक वाढली

कुंभार यांनी 11 आदेशांपैकी (रिस्टोर्ड ऑर्डर) 7 आदेशांच्या प्रती कार्यालयात आहेत. त्यासाठी सात लाख रुपयांची लाच कुंभार यांनी तक्रारदाराकडे मागितली. त्यानंतर तक्रारदाराने तडजोडीत चार लाख रुपये देण्याचे मान्य केले. रविवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास एसीबीने सापळा लावला.

Bribe Case
Pune Wholesale Market Prices: पुणे भुसार बाजारात दरांचा चढ-उतार; डाळ-तेल महाग

तक्रारदाराकडून चार लाख रुपयांची लाच घेताना कुंभार यांना पकडले. एसीबीचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस आयुक्त सतीश वाळके आणि पथकाने ही कारवाई केली. पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news