

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पीएमपी प्रशासनाकडून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त शुक्रवारी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांची माहिती सांगून, त्यांचा ऐतिहासिक आठवणींना उजाळा देण्यात आला. तसेच, यावेळी पीएमपी प्रशासनाने उपस्थित पत्रकारांचा सन्मान करून, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे महत्व सांगितले. पीएमपीएमएलच्या सहव्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा पोतदार-पवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी पीएमपीचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी योगेश होले, चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) दत्तात्रय झेंडे, चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (कमर्शियल) सतिश गव्हाणे, चिफ कंट्रोल ऑफ स्टोअर्स राजेश रूपनवर, चिफ सिव्हिल इंजिनियर दत्तात्रय तुळपुळे, विद्युत अभियंता प्रशांत कोळेकर, कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे, डेपो मॅनेजर विजय रांजणे उपस्थित होते.