अपुर्‍या बसमुळे प्रवासी रस्त्यावर ; बस सेवा कोलमडली

अपुर्‍या बसमुळे प्रवासी रस्त्यावर ; बस सेवा कोलमडली

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा :  पुणे महापालिकेचा विस्तार सिंहगड रस्त्यासह खडकवासला धरणाच्या पुढे गोर्‍हे बुद्रुक हद्दीपर्यंत वाढला आहे. मात्र, या भागातील पीएमपीएमएलची बस सेवा कोलमडल्याने हजारो प्रवाशांना बसच्या प्रतीक्षेत रस्त्यावर उभे राहवे लागत आहे. दुसरीकडे खासगी प्रवासी रिक्षांची संख्या वर्षभरात चारपटींनी वाढली आहे. तीन प्रवासी क्षमतेच्या रिक्षात आठ-दहा प्रवासी कोंबले जात आहेत. अपुर्‍या बस, धोकादायक प्रवासामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, तर दुसरीकडे पीएमपीएल, परिवहन प्रशासन सुस्तावले असल्याचे गंभीर चित्र या परिसरात आहे. बसमध्ये जागा मिळत नसल्याने प्रवाशांना नाईलाजाने रिक्षातून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अपुर्‍या बसमुळे विद्यार्थी, नागरिक व पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. बसपेक्षा जादा भाडे घेणार्‍या खासगी रिक्षांतून महिला, कामगार व विद्यार्थी दाटीवाटीने ये-जा करत असल्याचे गंभीर चित्र खडकवासला, नांदेड, किरकटवाडी या सिंहगड रस्त्यावरील भागांत दिसत आहे.

खडकवासला भाजपचे उपाध्यक्ष रूपेश घुले म्हणाले, या परिसरात सोसायट्या, लोकवस्त्यांचे जाळे पसरले आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढली आहे. मात्र, त्या तुलनेत बसेसची संख्या कमी आहे. नांदेड गाव, खडकवासला धरण अशा ठिकाणी जादा फेर्‍या सुरू कराव्यात त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. पानशेत धरण, सिंहगडच्या डोंगरदर्‍यात पीएमपीएल बस सेवा सुरू झाली आहे. या भागातील बस खानापूर,डोणजेपर्यंतच हाऊसफुल्ल होतात, त्यामुळे सकाळी ते दुपारच्या वेळी खडकवासला, नांदेड आदी ठिकाणच्या प्रवाशांना या बसमध्ये अनेकदा जागा मिळत नाही. मात्र, बसची संख्या अपुरी आहे.

दुर्घटनांची टांगती तलवार एका रिक्षामध्ये 7-8 प्रवासी कोंबून अक्षरशः जनावरांसारखी वाहतूक केली जात आहे. जीवघेण्या प्रवासामुळे दुर्घटनांची टांगती तलवार लटकत आहे. मात्र, याकडे पोलिस तसेच परिवहन विभागाने दुर्लक्ष केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news