Pashan Water Crisis
पाषाणमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण; दुसर्‍या दिवशीही पाणीपुरवठा बंद File Photo

Pashan Water Crisis: पाषाणमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण; दुसर्‍या दिवशीही पाणीपुरवठा बंद

पाणीपुरवठा विभागाला अनेक वेळा कामाचा अंदाज येत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय
Published on

बाणेर: पाषाण, सुतारवाडी, बाणेर, बालेवाडी परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. गुरुवारी (दि.17) पुणे शहरात पाणीपुरवठा होणार नसल्याचे विभागाने जाहीर केले होते. मात्र जलवाहिन्यांच्या देखभाल, दुरूस्तीचे काम पूर्ण न झाल्यामुळे शुक्रवारीही या भागात पाणीपुरवठा झाला नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागली.

पाणीपुरवठा विभागाला अनेक वेळा कामाचा अंदाज येत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवूनही जलवाहिन्यांच्या देखभाल, दुरूस्तीचे काम पूर्ण न झाल्याने अनेक वेळा शुक्रवारी पाणी येत नाही किंवा कमी दाबाने आणि कमी वेळ पाणी येते. (Latest Pune News)

Pashan Water Crisis
Pune News: गरिबांची घरे जमीनदोस्त, धनदांडग्यांना मात्र अभय! पानशेत धरणभागातील अतिक्रमण कारवाईचे विधिमंडळात पडसाद

त्यामुळे कामासाठी नेमका किती कालावधी लागणार याचे नियोजन करताना पाणीपुरवठा विभागाची चूक होत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. पाषाण, सुतारवाडी, बाणेर, बालेवाडी परिसरातील नागरिकांना शुक्रवारी पुन्हा त्याचा प्रत्यय आला. परिसरातील चाळी आणि वस्त्यांमध्ये टँकरही जाऊ शकत नसल्याने रहिवाशांची पाण्यासाठी वणवण सुरू असल्याचे चित्र दिसून आले. घरांमध्ये पिण्याचे शिल्लक नसल्याने नागरिकांना प्रशासनाच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला.

Pashan Water Crisis
Dam Water Update: धरणसाखळीतील पाण्याची वाढ मंदावली; धरणांत 78.25 टक्के साठा

याबाबत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी संपर्क साधला असता काहींशी संपर्क झाला नाही. तर काही अधिकार्‍यांना काम कधी पूर्ण होईल हे सांगता आले नाही. तर काहींनी शुक्रवारी काम पूर्ण होणे अवघड असून, शनिवारी (दि.18) पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news