Pune : पारगावला उपसरपंचपदासाठी रस्सीखेच

Pune : पारगावला उपसरपंचपदासाठी रस्सीखेच

नानगाव : दौंड तालुक्यातील मोठ्या व महत्त्वाच्या असलेल्या पारगाव सा. मा. या ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत श्री तुकाईदेवी युवा क्रांती पॅनलने सरपंचपदाच्या उमेदवारासह बारा सदस्य निवडून आणून बहुमत मिळविले. सरपंचपद हे जनतेतून असल्याने सरपंचपदाची निवड झाली. मात्र, दि. 23 रोजी उपसपंचपदाची निवड होत असल्याने या पदासाठी चांगलीच
रस्सीखेच असल्याची चर्चा गावात सुरू आहे. उपसरपंचपदासाठी राजाभाऊ तांबे यांचे पुतणे बाजीराव तांबे, सयाजी ताकवणे यांचे पुत्र संभाजी ताकवणे, पोपटभाई ताकवणे यांचे पुत्र रामकृष्ण ताकवणे, तर सुनिता चितळकर यादेखील इच्छुक असल्याची चर्चा आहे. उपसरपंचपदाची पहिली माळ गावनेत्यांच्या पुत्रांच्या गळ्यात पडणार, की इतरांना संधी मिळणार याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. विजयी सभेच्या वेळी राजाभाऊ तांबे यांनी प्रथम आम्हाला उपसरपंचपदाची संधी मिळावी, अशी इच्छादेखील व्यक्त केली होती. त्यामुळे पुढे काय होणार हे पाहणेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे.

सध्याच्या सत्ताधारी गटात कोणीही इच्छुक नसून उपसरपंचपदावर सर्वानुमते विचार करून सर्वांना संधी दिली जाईल, असे बोलले जात असलेतरी प्रथम आपल्याला संधी मिळावी, अशी इच्छादेखील बोलून दाखवली जात आहे. प्रथम कोणाच्या गळ्यात उपसपंचपदाची माळ घालायची यासाठी सत्ताधारी गटाला मोठी कसरत करावी लागणार आहे. निवडीच्या या वाटाघाटीत कोणी नाराज होऊ नये याकडेदेखील प्रमुख नेत्यांना पाहावे लागणार आहे. त्यामुळे पहिला उपसरपंच कोण हे 23 नोव्हेंबरलाच
कळणार आहे.

उपसरपंच निवडणूक कार्यक्रम
गुरुवार, दि. 23 रोजी उपसरपंच निवडणूक, ठिकाण-पारगाव सा.मा. ग्रामपंचायत कार्यालय. उपसरपंचपदासाठी नामनिर्देशन पत्र भरण्याची वेळ-सकाळी 11:00 ते 12:00 वाजेपर्यंत, अर्जाची छाननी-12:00 ते 1:00 वाजेपर्यंत, उमेदवारी अर्ज माघारीची वेळ-1:00 ते 2:00 वाजेपर्यंत, उपसरपंचपदाची निवड-दुपारी 2:00 वाजता निवड होणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी एम. टी. बडे यांनी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news