

पुणे: अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, मुलीचे लग्न आमच्या मुलासोबत लावून न दिल्यास मुलीच्या आईला तिचा आणि तिच्या मुलीचा मर्डर करेन, अशी धमकी देणार्या आई- वडिलांवर व लैंगिक अत्याचार करणार्या मुलावर लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सैफअली पठाण, सरताज पठाण व मुलाचे वडील यांच्यावर लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना तिच्याशी इन्स्टाग्रामवरील ओळख करून तिला कॉलेजबाहेर बोलावून तिला आरोपीने विश्वासात घेऊन फिरण्यासाठी नेले. तेथे तिच्याशी अश्लील चाळे केले. (Latest Pune News)
त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर जबरदस्तीने आरोपीने लैंगिक अत्याचार केले. या अत्याचाराचे नकळत फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. तर, आरोपीच्या आई-वडिलांनी, तू जर आमच्या मुलासोबत तुझ्या मुलीचे लग्न लावून दिले नाही, तर तुझा व तुझ्या मुलीचा मर्डर करेन, अशी धमकी दिली. हा प्रकार मार्च 2024 ते 9 ऑगस्ट 2025 दरम्यान घडला.