Wild Boar Crop Damage: पानशेत-आंबी परिसरात रानडुकरांचा धुमाकूळ

भातपिकाचे मोठे नुकसान; शेतकर्‍यांना आर्थिक फटका
pune news
Wild Boar Crop DamagePudhari
Published on
Updated on

वेल्हे : पानशेत-आंबी परिसरात रानडुकरांचा धुमाकूळ सुरू आहे. भात, भुईमूग आदी पिके रानडुकरांचे कळप रातोरात जमीनदोस्त करीत आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. (Pune Latest News)

सततच्या पावसामुळे भातरोपांचा तुटवडा निर्माण झाला असतानाही शेतकर्‍यांनी कशीबशी रोपांची लागवड केली. पानशेत धरणाजवळील आंबी (ता. हवेली), रुळे, कांदवे, वांजळवाडी, कुरण खुर्द, पानशेत (ता. राजगड) व परिसरात मागील 8 ते 10 दिवसांपासून रानडुकरांचे चार ते पाच कळप रातोरात उभी पिके जमीनदोस्त करत आहेत.

pune news
Pune News: 200 वर्षांपूर्वीच्या वारसावैभवाचे साक्षीदार रास्ता पेठेतील मंदिर

सततच्या पावसामुळे वनक्षेत्रासह खासगी जंगलात झाडे-झुडपे तसेच गवत वाढले आहे. त्यामुळे जंगलात बिबट्यांचा वावर वाढला आहे. भात, भुईमूग पिके खाण्यासाठी आलेल्या रानडुकरांवर बिबटे हल्ले करत आहेत. बिबट्यांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी रानडुकरे भात पिकातून सैरावैरा धावत असतात. त्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान होत आहे.

pune news
Accident News: अपघातात वडिलांचा मृत्यू; मुलाविरोधात गुन्हा

आंबी येथील दीपक गणपत निवंगुणे, सोनबा बबन निवंगुणे, सुरेश धोंडिबा निवंगुणे, पोपट रघुनाथ निवंगुणे आदी शेतकर्‍यांच्या उभ्या भात पिकाचे रानडुकरांनी नुकसान केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news