भारतच पनीरचा निर्मिता, साडेचार हजार वर्षांपूर्वीच केली निर्मिती!

भारतच पनीरचा निर्मिता, साडेचार हजार वर्षांपूर्वीच केली निर्मिती!

पुणे : तब्बल साडेचार हजार वर्षांपूर्वी हिंदू संस्कृतीतील दुधाच्या वापराचे पुरावे सापडले आहेत. त्या काळात पनीर देखील तयार केले जात होते, असा संशोधकांचा दावा आहे. मातीच्या सचित्र भांड्यात हे पुरावे पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या संशोधकांना सापडले असून, दक्षिण आशिया खंडातील अशा प्रकारचे हे सर्वात मोठे संशोधन आहे.

पुणे शहरातील डेक्कन कॉलेजमध्ये डॉ. प्रबोध शिरवळकर हे हिंदू संस्कृतीवर संशोधन करीत आहेत. त्यांचे हरप्पा संस्कृतीवर संशोधन सुरूच आहे. त्यासोबतच त्यांनी हिंदू संस्कृतीतील छोट्या-छोट्या गावांवर संशोधन करण्याचे ठरवले आणि त्यातूनच हे मोठे संशोधन हाती आले. गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यात नखमाणा तालुक्यात कोठडा भडली
नावाचे गाव आहे. तिथून बाहेरच्या देशात जाण्यासाठीच हा व्यापारी मार्ग होता.

सिंधू संस्कृतीतील लोक या व्यापारी मार्गाने बाहेरच्या देशात जात असत. व्यापारी लोकांसाठी बांधलेल्या या छोट्या-छोट्या वस्त्या म्हणजेच सिंधू संस्कृतीतील छोटी-छोटी गावे होत. याच ठिकाणी उत्खनन करताना इसवी पूर्व 23 हजार वर्षांपूर्वीची मातीची भांडी सापडली. विविध प्रकारच्या मण्यांच्या बांगड्या, महागड्या स्टोनचे दागिने अशा मौल्यवान वस्तूदेखील सापडल्या आहेत.

कॅनडामध्ये केले रासायनिक पृथक्करण

डॉ. प्रबोध शिरवळकर यांचे विद्यार्थी डॉ. यदुवीरसिंग रावत हे कॅनडातील टोरंटो विद्यापीठांमध्ये कार्यरत आहेत. त्यांना ही भांडी पाठवण्यात आली. सात ते आठ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर जे पुरावे सापडले ते थक्क करणारे आहेत. या मातीच्या भांड्यात सापडलेल्या अवशेषांचे अत्यंत बारकाईने पृथक्करण केले तेव्हा त्यात दुधाचे अवशेष असल्याचे लक्षात आले. तसेच ही मातीची भांडी सच्छिद्र असल्याने त्या काळात त्या भांड्यांमध्ये पनीर तयार करीत असल्याचा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला. दक्षिण आशियामधील अशा प्रकारचे हे पहिलेच संशोधन असल्याचा दावा डॉ. शिरवळकर यांनी केला आहे. इसवी पूर्व 2300 ते 2100 वर्षांपूर्वीची ही भांडी आहेत.

कारवन सराईचा शोध..

डॉ. शिरवळकर यांनी सांगितले की, मोठ्या वसाहतींवरचे संशोधन सुरूच आहे. त्यात खूप मोठे पुरावे हाती आले आहेत. मात्र, सिंधू संस्कृतीतील छोटी-छोटी गावे संशोधनातून सुटून गेली होती. त्यामुळे आम्ही हे छोटे गाव निवडले. तिथे ही मातीची भांडी उत्खननात सापडली. त्या वेळी व्यापारी मार्गाने जाणारे लोक या वसाहतीत थांबत असत, असा निष्कर्ष आम्ही काढला आहे. या संपूर्ण संशोधनाला सात ते आठ वर्षांचा कालावधी लागला 2016 मध्ये आम्ही हे संशोधन सुरू केले होते.

  • मातीच्या सच्छिद्र भांड्यात दडले होते दुधाचे अवशेष
  • गुजरातमधील कोठला भडली गावात सापडले
  • दक्षिण आशिया खंडातील पहिले पुरावे
  • डेक्कन कॉलेजच्या संशोधनाला मोठे यश
  • डॉ. प्रबोध शिरवळकर यांनी लावला शोध

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news