आषाढी वारी सोहळा-2023 पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. ऑनलाइनद्वारे महसूलमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. आमदार दत्तात्रय भरणे, संजय जगताप, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पुण्याचे सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पालखी सोहळ्याचे प्रमुख आदी उपस्थित होते.