खडकवासला येथे होणार ऑक्सिजन पार्क; साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर

खडकवासला येथे होणार ऑक्सिजन पार्क; साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर
Published on
Updated on

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : खडकवासला धरणाच्या पडीक जमिनीवर राज्यातील पहिला महत्त्वाकांक्षी ऑक्सिजन पार्क नक्षत्र गार्डन पर्यटन उभारण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाने पहिल्या टप्प्यात साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या प्रकल्पामुळे खडकवासला धरण, सिंहगड किल्ल्यावर येणार्‍या पर्यटकांना नवीन विकसित पर्यटनस्थळ उपलब्ध होणार आहे.
या प्रकल्पाच्या कामास रविवारी (दि. 11) उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सुरुवात होणार आहे.

आमदार भीमराव तापकीर यांच्या प्रयत्नातून या प्रकल्पाला शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. खासगी संस्थांच्या माध्यमातून पर्यटन विकास प्रकल्पाची उभारणी न करता शासनाने या प्रकल्पाची उभारणी करावी. पाटबंधारे विभागाच्या जमिनीवर अतिक्रमणे होण्याचा धोका असल्याने या प्रकल्पासाठी तापकीर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत या प्रकल्पाला विशेष मंजुरी देण्यात आली आहे. तापकीर म्हणाले, 'सिंहगड, खडकवासला भागात मोठ्या संख्येने पर्यटक गर्दी करत आहेत. मात्र गड परिसरात सुट्टीच्या दिवशी पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे हजारो पर्यटकांना माघारी जावे लागत आहे. वीस एकर जमिनीवर हा प्रकल्प होणार आहे. त्यामुळे तेथे एकाच वेळी हजारो पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे.'

या प्रकल्पाच्या कामासाठी पहिल्या टप्प्यात साडेतीन कोटी रुपयांचा निधी मिळाला असून, त्यावर 25 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. टप्प्या-टप्प्याने प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

– भीमराव तापकीर, आमदार

पर्यटन महामंडळाकडून विकास आराखडा मंजूर

ब्रिटिश राजवटीत 1879 मध्ये खडकवासला धरण बांधले, तेव्हापासून परिसरात पडीक जमिनी वापराविना पडून आहेत. या पडीक जमिनीवर अतिक्रमणांचा धोका वाढला आहे. उर्वरित पडीक जमिनीवर पर्यटकांसाठी सुसज्ज व विविध सेवा सुविधा असलेले पर्यटन केंद्र उभारण्यात येणार आहे. पर्यटकांसाठी ऑक्सिजन पार्क, नक्षत्र गार्डनसह तलाव, विविध वनस्पती पार्क, पर्यटकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्याचा आराखडा पर्यटन विकास महामंडळाने केला आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news