

ओतूर : ओतूर (ता. जुन्नर) पोलिस ठाण्याच्या हद्दीत सात वर्षीय बालिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी एका नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
देवीदास रोहीदास गर्जे (सध्या रा. नेतवड, ता. जुन्नर, जि. पुणे, मुळ रा. बडेवाडी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) असे या नराधमाचे नाव असून त्याला ओतूर पोलिसांनी तात्काळ अटक केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सात वर्षीय अल्पवयीन मुलगी घराच्या आजुबाजूला खेळत असताना देवीदास गर्जे या नराधमाने रविवारी सायंकाळी बलात्कार केला. ओतूर पोलिसांनी पीडित बालिकेच्या कुटुंबियांची तक्रार दाखल करून घेत गर्जे या आरोपीला अटक केली आहे. तसेच पीडित अल्पवयीन मुलीला पुणे येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले असून या गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास ओतूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक लहु थाटे हे करीत आहेत.