पिंपरी : नाटके कमी; इतर कार्यक्रमांनीच नाट्यगृहांचा भरतोय गल्ला

पिंपरी : नाटके कमी; इतर कार्यक्रमांनीच नाट्यगृहांचा भरतोय गल्ला
Published on
Updated on

वर्षा कांबळे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चार नाट्यगृहांमध्ये सध्या दोनच दिवस नाटके आणि आठवड्याचे पाच दिवस सांस्कृतिक कार्यकमांचे बुकिंग फुल झाले आहे. त्यामुळे नाटके कमी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनीच सध्या नाट्यगृहांचा गल्ला भरत असल्याचे चित्र आहे. सध्या सर्वच नाट्यगृहांमध्ये शाळांमधील स्नेहसंमेलनाचे बुकिंग जोरात सुरू आहे. पूर्वी शहरातील नागरिकांना नाटके पाहण्यासाठी पुण्यामध्ये जावे लागत होते. शहरातील हौशी नाट्यरसिक प्रेमींसाठी शहरात चार ठिकाणी सुसज्ज अशी नाट्यगृहे बांधण्यात आली आहेत.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, पिंपळे गुरवचे नटसम—ाट निळू फुले नाट्यमंदिर आणि पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिर अशी चार नाट्यगृहे आहेत. कालांतराने नाट्यगृहांचा उपयोग हा नाटके सादर करण्यासाठी न होता इतर कार्यक्रमांसाठी होत होता. त्यामुळे नाट्यकलावंताना हक्काचे नाट्यगृह असताना नाटके सादर करण्यास वाट पहावी लागत होती. यावर आवाज उठविल्यानंतर आठवड्याचे दोन दिवस शनिवार आणि रविवार हा नाटकांसाठी राखीव ठेवला गेला आहे.

तसेच मध्येच एखादे नाटक असल्यास त्यासाठी दिवसाचे बुकिंग राखीव ठेवले जाते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत जानेवारीपासून फेब—ुवारी आजतागायत नाट्यगृहांना शाळा, महाविद्यालयांची स्नेहसंमलने, वधू-वर मेळावे, पुरस्कार सोहळे, महिला दिन कार्यक्रम आणि इतर कार्यक्रमांचा भरघोस प्रतिसाद आहे. त्यामुळे पुढील मार्च महिन्याच्या तारखादेखील बुक झाल्या आहेत.

या कारणांनी नाटकांना प्रतिसाद कमी
शहरातील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहाचा अपवाद सोडला, तर बाकी तीन नाट्यगृहांना नाटकांचा अजिबात प्रतिसाद नाही. आचार्य अत्रे रंगमंदिरात आड बाजूला असून पार्किंगची समस्या आहे. तसेच नाट्यसंस्थांना सामान नेण्यासाठी रॅम्प नाही. भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृह व नटसम—ाट निळू फुले नाट्यमंदिर लांब असल्याने रसिक प्रेक्षकांना जायला परवडत नाही. त्यामुळे प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी लाभतो. या कारणास्तव नाट्य संस्थाचालकांना नाट्य सादरीकरण करण्यास परवडत नाही.

नाटकांना सलवतीचे दर तरीही प्रतिसाद कमीच
नाटकांची निर्मिती आणि नाटक कंपन्यांचा प्रवास तसेच नाट्यकलावंताची बिदागी यामुळे नाट्यनिर्मिती महाग होत आहे. नाट्यसंस्थांना नाट्यगृहांचे भाडे परवडणारे नाही. ही अडचण लक्षात घेऊन नाट्यसंस्थांना सवलतीच्या दरात भाडे आकारले जात आहे. तरीदेखील पिंपरी चिंचवड शहरात नाट्यगृहांना नाटकांचा प्रतिसाद थंडावल्याचे चित्र आहे. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह हे मध्यवर्ती व सोयीस्कर असे ठिकाण असल्यामुळे नाटकांना आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रचंड प्रतिसाद मिळत असतो. ऐरवी नाटकांसाठी पसंती असणारे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातदेखील नाटकांऐवजी शाळांच्या स्नेहसंमेलनाच्या तारखा फुल झाल्या आहेत.

जानेवारी 2023 ते फेब्रुवारी 2023 मिळालेले उत्पन्न
नाट्यगृहे        नाटक दर            इतर कार्यक्रमाचे दर          एकूण कार्यक्रम         उत्पन्न
प्रा. मोरे          2500                   9500 (5 तास)                      104               1025500
28,400 (दिवसभर)
आचार्य अत्रे    1830                    7494 (3 तास)                      98                 622368
11210 (दिवसभर)
कै. लांडगे     3600                    14, 42 (5 तास)                      81               2096596
34,870 (दिवसभर)
निळू फुले     5487                    10,561 (3 तास)                    96                 7 लाख
42,185 (10 तास)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news