सासवड येथील जमीन मोजणीस विरोध

सासवड येथील जमीन मोजणीस विरोध
Published on
Updated on

सासवड(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सासवड (ता. पुरंदर) येथील नगर परिषद हद्दीतील स. नं. 127 (हाडकी) ही मालकी हक्काची असून, सासवड नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी व मोजणी अधिकारी या जमिनीची मोजणी करण्यास आले होते. या वेळी स्थानिक शेतकर्‍यांनी याला तीव्र विरोध केला, तसेच मोजणी होऊ दिली नाही. येथील समाजबांधवांची पर्यायी व्यवस्था केली नाही, तर पुढील काही दिवसांत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रशांत चौरे यांनी दिला. सासवड (ता. पुरंदर) येथील सर्वे नंबर 127 व अशोकनगर परिसरातील भूखंडावर अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकवस्ती आहे.

लोकवस्तीमध्ये काँक्रीट रस्ते, गल्लीबोळ काँक्रीट, दिवाबत्तीची सोय, प्रत्येक कुटुंबीयांना स्वतंत्र नळजोडणी इत्यादी सुखसुविधा देण्यात आली. यापूर्वी शहरातील स्मशानभूमीसाठी असलेला रस्ता बंद करून जातीय द्वेषातून समाजाच्या ईनाम (वर्ग 6 ब) हाडक्या, हाडोळी यांच्या असलेल्या शेतजमिनी नगरपालिकेने स्थानिक मालकांची संमती न घेता नव्याने रस्ता सर्वे नंबर 128 लगत अनधिकृत गाव नकाशाचा रस्ता बंद करून या कुटुंबीयांच्या मिळकतीमधून केला आहे. परिणामी, त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याचा मोबदला दिलेला नाही किंवा त्यांच्याकरिता पर्यायी व्यवस्थादेखील करण्यात आली नाही. तसेच या स. नं. 127 मोजणी दि. 30 मे 1995 रोजी झालेली आहे.

या जागेत अनुसूचित जाती प्रवर्गातील कष्टकरी, उपेक्षित बांधवांच्या रस्त्यालगत असलेले छोट्या टपर्‍या, शेड, तसेच छोटे व्यावसायिक व इतर घटक अन्य व्यवसायांवर आपला उदरनिर्वाह करतात. येथील मूळ मालकांना पर्यायी व्यवस्था केली नाही, तर सासवड नगर परिषदेविरोधात दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल, असे प्रशांत चौरे म्हणाले. या वेळी शेतकरी सोपान रणपिसे, घनश्याम रणपिसे, राजेंद्र गिरमे, सलील साळुंखे, पुष्पा रणपिसे, वंदना रणपिसे, कमल रणपिसे, रखमाबाई रणपिसे आदी उपस्थित होते.

सासवड येथील सर्वे नंबर 127 मधील भूसंपादन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रस्ताव सासवड नगर परिषदेने दिला आहे. पुढील कारवाई दौंड-पुरंदरचे प्रांताधिकारी यांच्यामार्फत करण्यात येईल.

                              निखिल मोरे, मुख्याधिकारी, सासवड नगरपरिषद

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news