मावडी कडेपठार येथे अफूची शेती : दोघांवर पोलिसांची कारवाई

मावडी कडेपठार येथे अफूची शेती : दोघांवर पोलिसांची कारवाई
Published on
Updated on

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : जेजुरी पोलिस ठाणे हद्दीतील मावडी कडेपठार गावातील एका शेतामध्ये बेकायदेशीरपणे अफूच्या झाडांची लागवड करण्यात आली होती. जेजुरी पोलिसांनी गुरुवारी (दि. 29) या शेतावर छापा मारून सुमारे 76 हजार रुपये किमतीची 38 किलो अफूची झाडे जप्त केली आहेत. अफूची शेती करणार्‍या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती जेजुरीचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी दिली. किरण पुंडलिक जगताप (वय 40) व रोहिदास चांगदेव जगताप (वय 55, रा. मावडी कडेपठार, ता. पुरंदर) या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मावडी कडेपठार गावातील किरण जगताप व रोहिदास जगताप यांच्या शेतात बेकायदेशीरपणे अफूची लागवड केली असल्याची माहिती जेजुरी पोलिसांना मिळाली. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरीचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे, पोलिस उपनिरीक्षक नामदेव तारडे पाटील, पोलिस हवालदार तात्यासाहेब खाडे, सोमनाथ चितारे, हिरामण पवार, शुभम भोसले, भानुदास सरक, नाना घोगरे यांनी अफूच्या शेतीवर छापा मारून कारवाई केली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news