

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पादचार्यांना रस्ता ओलांडण्यासाठी आयआरसीच्या मार्गदर्शकानुसार किमान 15 ते 20 सेकंद असायला हवेत. मात्र, भांडारकर इन्स्टिट्यूटजवळील (लॉ-कॉलेज रस्ता) रस्ता येथील चौक ओलांडण्यासाठी फक्त 7 सेकंदांची वेळ सिग्नलवर देण्यात आली आहे. त्यामुळे अवघ्या 7 सेकंदांत रस्ता कसा ओलांडायचा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
स्मार्ट सिटीचा गाजावाजा झालेल्या एटीएमएस प्रणालीमध्ये 125 चौकांचा समावेश आहे. यातील सुमारे 85 चौकांमधील सिग्नल महिनाभरापूर्वी कार्यान्वित झाले आहेत. एकीकडे अंमलबजावणी करत असताना मागील सिग्नलची अवस्था कशी आहे, हे पाहणे गरजेचे आहे. मात्र, तसे होत नसल्याचे दिसत आहे. यासंदर्भात अभ्यंकर म्हणाले, महापालिकेच्या विद्युत विभागाचे श्रीनिवास कंदुल यांच्याशी या विषयावर माझी चर्चा झाली. याबाबत लवकरच उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सिग्नलचे प्रोग्रामिंग मनपाच्या विद्युत विभागाचे कंत्राटदार करतात. ते कसे करतात, त्यांचे काम कसे चालते, याकडे विभागाच्या अधिकार्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. अधिकार्यांनी 7 सेकंदांमध्ये हा चौक ओलांडून दाखवावा.
हर्षद अभ्यंकर,
सेव्ह पुणे ट्राफिक मूव्हमेंट
हेही वाचा