Pune News| पुण्यातील अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद, फक्त २० हजारांवर प्रवेश

दुसरी फेरी उद्यापासून राबवणार
Only 20 thousand students admission for 11th
अकरावीसाठी केवळ २० हजारांवर विद्यार्थ्यांचा प्रवेशFile Photo

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र असून, पहिल्या फेरीत प्रवेश जाहीर झालेल्या ३८ हजार ८९० विद्यार्थ्यांपैकी कॅपमध्ये केवळ २० हजार ५३६ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे.

Only 20 thousand students admission for 11th
Police Bharti | धावण्याचा वेग मंदावल्याने गुणांवर परिणाम

दरम्यान, अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीने दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना उद्या ३ जुलैपासून महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरता येणार आहेत. त्याचप्रमाणे आत्तापर्यंत नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल,

असे स्पष्ट करण्यात आले आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नागपूर, नाशिक, अमरावती अशा महानगरांमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे.

Only 20 thousand students admission for 11th
भुशी धरण दुर्घटना | बुडालेल्या पाचही जणांचे मृतदेह सापडले

या प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या फेरीची प्रवेश यादी २६ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात नोंदणी केलेल्या ६६ हजार ९३४ विद्यार्थ्यांपैकी ३८ हजार ८९० विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाले होते. या विद्यार्थ्यांना सोमवारी १ जुलैला सायंकाळी सहापर्यंत प्रवेश घ्यायचा होता.

त्यापैकी २० हजार ५३६ विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश कागदपत्रे आणि शुल्क भरून निश्चित केला आहे. त्यामुळे सुमारे १८ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नसल्याचे चित्र आहे. यातील अनेकांना पहिल्या पसंतीचे कॉलेज प्रवेशासाठी जाहीर झाले होते.

Only 20 thousand students admission for 11th
शिवसेनेसोबतची युती ही काळाच्या कसोटीवर उतरलेली मैत्री : PM मोदी

या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे अनिवार्य होते. मात्र, त्यांनी प्रवेश घेतला नसल्यास, दुसऱ्या फेरीत सहभागी होता येणार नाही. याचाच अर्थ त्यांची नामांकित कॉलेज प्रवेशाची संधी हुकली आहे. दरम्यान, कॅपच्या ९३ हजार ७६९ आणि कोटा प्रवेशाच्या २६ हजार ४९६ अशा एकूण १ लाख २० हजार २६५ जागा उपलब्ध आहेत. अद्यापही ९४ हजार ९२४ जागा रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. pune. 11thadmission.org.in/Public/ Home.aspxnmoQ>©bda यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

असे आहेत टप्पे

यापूर्वी नोंदणी न केलेल्यांनी नाव नोंदणी करून, कॉलेजांचे पसंतीक्रम भरणे; तसेच प्रवेश जाहीर न झालेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजचे पसंतीक्रम बदलण्याची संधी ३ ते ६ जुलै (रात्री १०) कोटा प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू :

३ ते ६ जुलै विद्यार्थ्यांनी भरलेल्या माहितीच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करणे; तसेच डेटा प्रोसेसिंग :

७ ते ९ जुलै प्रवेशाची दुसरी निवड यादी प्रसिद्ध करणे:

१० जुलै सकाळी १० वाजता. प्रवेश निश्चित करून, कॉलेजांमध्ये कागदपत्रे आणि शुल्कांद्वारे प्रवेश घेणे :

१० ते १२ जुलै (सायं. ६) कॉलेजांनी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची माहिती अपलोड करणे:

१२ जुलै रात्री ८ पर्यंत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news