चाकण : आवक घटल्याने कांदा महाग !

चाकण : आवक घटल्याने कांदा महाग !

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक गेल्या शनिवारच्या तुलनेत 600 क्विंटलने घटल्याने कांद्याच्या दरात 10 टक्क्यांनी वाढ झाली. गुजरातहून कै-यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. डांगर भोपळ्यासह परवल व हिरव्या मिरचीची मोठी आवक झाली. चाकण येथील बाजारात गुजरातहून आलेल्या कै-यांना लोणच्यासाठी चांगली मागणी आहे. साता-याहून आले, मुरबाडहून भेंडी व तोतापुरी कलमी आंबा आणि परवलची आवक झाली.

जनावरांच्या बाजारात जर्शी गाई, बैल, म्हैस व शेळ्या मेंढ्या आणि बोकडांच्या विक्रीत वाढ झाली. आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर चाकणमध्ये 10 हजार ते दीड लाख रुपयांचे बोकड विक्रीसाठी आले होते. एकट्या शेळ्या-मेंढ्या व बोकड बाजारात सात कोटींची उलाढाल झाली; तर एकूण मार्केटची उलाढाल 9 कोटी 80 लाख रुपये झाली.

कांद्याची एकूण आवक 900 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत आवक 600 क्विंटलने घटली. कांद्याचा कमाल भाव 1,300 रुपयांवर पोहचला. बटाट्याची एकूण आवक 1,250 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत आवक स्थिर राहिली.भावात 200 रुपयांची वाढ झाली. बटाट्याचा कमाल भाव 1,800 रुपयांवरून 2 हजार रुपयांवर पोहोचला. लसणाची एकूण आवक 40 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत आवक स्थिर राहून कमाल भावही 8 हजार रुपयांवर स्थिरावला.

शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे :

कांदा – एकूण आवक – 900 क्विंटल. भाव क्रमांक 1. 1,300 रुपये, भाव क्रमांक 2. 1,000 रुपये, भाव क्रमांक 3. 700 रुपये.
बटाटा – एकूण आवक – 1,250 क्विंटल. भाव क्रमांक 1. 2,000 रुपये, भाव क्रमांक 2. 1,500 रुपये, भाव क्रमांक 3. 1,200 रुपये.
फळभाज्या : एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतीदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढीलप्रमाणे – टोमॅटो – 262 क्विंटल (3,000 ते 5,000 रुपये), कोबी – 215 क्विंटल (500 ते 800), फ्लॉवर – 197 क्विंटल (600 ते 900), वांगी – 83 क्विंटल (1,000 ते 2,000), भेंडी – 135 क्विंटल (2,000 ते 4,000), दोडका – 63 क्विंटल (3,000 ते 4,000), कारली – 69 क्विंटल (2,000 ते 3,000), दुधीभोपळा – 62 क्विंटल (1,000 ते 2,000), काकडी – 74 क्विंटल (2,000 ते 3,000), फरशी – 69 क्विंटल (2,000 ते 3,000), वालवड – 63 क्विंटल (1,500 ते 2,500), गवार – 14 क्विंटल (7,000 ते 9,000), ढोबळी मिरची – 136 क्विंटल (2,000 ते 3,000), चवळी – 24 क्विंटल (2,000 ते 3,000), वाटाणा – 55 क्विंटल (5,000 ते 7,000), शेवगा – 30 क्विंटल (2,000 ते 3,000), गाजर – 130 क्विंटल (2,000 ते 3,000).
पालेभाज्या – पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे – मेथी – एकूण 16 हजार 500 जुड्या (1,500 ते 2,200 रुपये), कोथिंबीर – एकूण 28 हजार 950 जुड्या (500 ते 1,500 रुपये), शेपू – एकूण 3 हजार, 550 जुड्या (800 ते 1,200 रुपये), पालक – एकूण 4 हजार 260 जुड्या (400 ते 600 रुपये).

जनावरे : विक्रीसाठी आलेल्या 9,300 बोकडांपैकी 6,200 बोकडांची विक्री झाली. बोकडांना 10,000 रुपयांपासून 35 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news