

वडगाव शेरी; पुढारी वृत्तसेवा : नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी विमाननगरमधील दोन मुख्य रस्त्यांवर एकेरी वाहतुकीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांनी याबाबत नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत. वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रक काढले आहे.
गणपती मंदिर चौकाकडून दोराबजी मॉल चौकाकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने बंद करण्यात येणार असून दोराबजी मॉल ते गणपती मंदिर, अशी एकेरी वाहतूक व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच सीसीडी चौकाकडून श्रीकृष्ण हॉटेल चौकाकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने बंद करण्यात येणार असून श्रीकृष्ण हॉटेल चौक ते सीसीडी चौक, अशी एकेरी वाहतूक व्यवस्था असेल.
प्रस्तावित एकेरी वाहतुकीविषयी सूचना असल्यास त्या वाहतूक शाखेकडे येत्या 17 नोव्हेंबरपर्यंत कळवायच्या आहेत. नागरिकांच्या सूचना व हरकतीचा विचार करून एकेरी वाहतुकीचा अंतिम आदेश काढण्यात येणार आहेत. काही वर्षांपूर्वी विमाननगरमध्ये एकेरी वाहतूक करण्यात आली होती. परंतु, नागरिकांनी आणि व्यापार्यांनी तीव्र विरोध केल्यामुळे त्यावेळी तो प्रस्ताव गुंडाळण्यात आला होता. आता पुन्हा एकेरी वाहतुकीचा प्रस्ताव आला आहे.
नागरिक मंचाचा प्रस्तावास विरोध
वडगाव शेरी नागरिक मंचाचे आशिष माने म्हणाले, 'अतिक्रमण, रस्त्यावरील पार्किंग ही वाहतूक कोंडीची मुख्य कारणे आहेत. त्याबाबत महापालिका व वाहतूक पोलिसांनी एकत्र येऊन ठोस पावले उचलून योग्य ती कार्यवाही केल्यास वाहतूक सुरळीतपणे चालू शकते. काही ठराविक राजकीय मंडळींच्या आग्रहाखातर एकेरी वाहतूक करण्यास विरोध आहे. तरी, आमच्या हरकतींचा विचार करून येथे एकेरी वाहतूक करू नये, तसे केल्यास आम्ही या निर्णयाविरुद्ध योग्य ती कायदेशीर दाद मागणार