पुणे : सर्व्हायकल कॅन्सरचा पाचपैकी एक रुग्ण भारतात

पुणे : सर्व्हायकल कॅन्सरचा पाचपैकी एक रुग्ण भारतात
Published on
Updated on

पुणे : स्तनांच्या कर्करोगानंतर महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाणात गर्भाशय मुखाचा कर्करोग अर्थात सर्व्हायकल कॅन्सर आढळून येतो. सर्व्हायकल कॅन्सरच्या जगातील प्रत्येक पाच रुग्णांपैकी एक रुग्ण भारतात आढळून येतो, असे 'लॅन्सेट' या वैद्यकीय नियतकालिकातील अहवालात नमूद करण्यात आले आहे. आशियातील एकूण रुग्णांपैकी 21 टक्के रुग्ण भारतात आढळून आले आहेत.

दरवर्षी जानेवारी हा 'गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग जनजागृती महिना' म्हणून साजरा केला जातो. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस या विषाणूमुळे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होतो. नियमित तपासणी, लवकर निदान आणि योग्य उपचार ही त्रिसूत्री सर्व्हायकल कॅन्सरच्या बाबतीत फायदेशीर ठरत असल्याचे स्त्रीरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे भारतातील प्रमाण 21 टक्के आहे. दरवर्षी जगातील सुमारे सहा लाख महिलांमध्ये कर्करोगाचे निदान होते. सिरम इन्स्टिट्यूटची संपूर्ण भारतीय बनावटीची लस उपलब्ध झाल्यास सामान्यांच्या आवाक्यात लसीकरण येऊ शकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे स्त्रीच्या प्रजननक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. योनीमार्गातील संसर्ग, अस्वच्छता, लैंगिक संक्रमण अशा कारणांमुळे कर्करोगाला आमंत्रण मिळते. कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असणे, धूम्रपानासारख्या सवयीही कर्करोगास कारणीभूत ठरत आहेत. योनीतून होणारा तीव्र रक्तस्त्राव, शारीरिक संबंधांनंतर किंवा अगदी मासिक पाळीच्या दरम्यान होणारा रक्तस्त्राव आणि ओटीपोटात वेदना ही लक्षणे दिसू शकतात.

                                                             – डॉ. भारती कुलकर्णी, स्त्रीरोगतज्ज्ञ

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news