drowne : भुगाव तलावात एकाचा बुडून मृत्यू

पौड : भुगाव येथे असलेल्या श्री छत्रपती शिवाजी जलाशयामध्ये बुडालेल्या दत्तात्रय मिसाळ याचा मृतदेहाचा शोध घेताना आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य व पोलीस.
पौड : भुगाव येथे असलेल्या श्री छत्रपती शिवाजी जलाशयामध्ये बुडालेल्या दत्तात्रय मिसाळ याचा मृतदेहाचा शोध घेताना आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य व पोलीस.

पौड; पुढारी वृत्तसेवा : भुगाव येथे असलेल्या श्री छत्रपती शिवाजी जलाशयामध्ये बुडालेल्या ( drowne ) दत्तात्रय मोतीराम मिसाळ (वय अंदाजे ३८, रा. शिवाजी नगर पुणे) याचा मृतदेह ९५ तासांनी शोधून काढण्यात पौड पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना यश आले आहे. हा तरुण दारू पिवून पाण्यात उतरून फोटोसेशन करीत होता. हे फोटोसेशनच त्याच्या जीवावर बेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. १७) भुगाव येथील श्री छत्रपती शिवाजी जलाशयाच्या कडेला मनोज भीमराव नगरकर (वय ५०, रा. गोखले नगर, पुणे), महेश नागनाथ अवघडे (वय २८, रा. शेलार कॉम्प्लेक्स पौड रोड), योगेश सुरेश गुणवंत (वय ४२, रा. गोखलेनगर) आणि दत्तात्रय मोतीराम मिसाळ (वय अंदाजे ३८, रा. शिवाजी नगर पुणे) हे चौघे जण दारू पिण्यासाठी बसले होते. यातील दत्तात्रय मिसाळ हा फोटोसेशन करण्यासाठी पाण्यात उतरला. त्याचा पाय एका ठिकाणी घसरल्याने तो पाण्यात बुडाला ( drowne ). त्याच्या मित्रांनी १०० नंबरवर फोन करून संबंधित घटनेची माहिती दिली.

यानंतर पौड पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन समितीने त्याचा शोध घेतला. चार दिवस शोध घेऊनही दत्तात्रयचा मृतदेह सापडत नव्हता. अखेर गुरूवारी (दि. २०) सकाळी आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमोद बलकवडे व त्यांच्या पथकाने दत्तात्रय याचा मृतदेह शोधून काढला. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पौड ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला. मृतदेह शोधकामी पोलिस हवालदार अनिता रवळेकर, निवास जगदाळे, भुकूमचे पोलिस पाटील सतीश गुजर यांनी मदत केली. या घटनेचा तपास पोलिस हवालदार अनिता रवळेकर या करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news