Pune Ganeshotsav 2023 : काश्मीरमधील दीड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन

Pune Ganeshotsav 2023 : काश्मीरमधील दीड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन

पुणे; प्रतिनिधी : काश्मीरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची दीड दिवसाच्या विसर्जनाने सांगता झाली. पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टसह प्रमुख मानाच्या गणपती मंडळांनी एकत्र येऊन काश्मीर येथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी पुढाकार घेतला होता. पुण्यासह जगभरात साजरा होत असलेला सार्वजनिक गणेशोत्सव काश्मीरमध्ये होत नाही, ही बाब लक्षात घेऊन सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवणार्‍या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीसह कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग, केसरीवाडा आणि अखिल मंडई या मंडळांनी गतवर्षी काश्मीरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचे जाहीर केले होते.

त्यानुसार या मंडळांनी ग्रामदेवता कसबा गणपतीची प्रतिकृती काश्मीरमधील गणपत्यार ट्रस्टचे संदीप कौल आणि सिशांत चाको यांच्याकडे सुपूर्द केली होती. त्यानुसार या मंदिरात गणेश चतुर्थीला सार्वजनिकरीत्या बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. दीड दिवसाने झेलम नदीत या बाप्पाचे विसर्जन करण्यात आल्याची माहिती या ट्रस्टकडून देण्यात आली. तसेच पुण्यातील या मंडळांचे आभारही या मंडळांनी व्यक्त केले.

काश्मीरमध्ये यंदा दीड दिवसाचा गणेशोत्सव साजरा झाला. या बाप्पाचे नुकतेच विसर्जन करण्यात आले आहे. या गणेशोत्सवामुळे काश्मीर भागात सुख-समृद्धी आणि शांतता नांदेल,

पुनीत बालन, विश्वस्त व उत्सव प्रमुख,
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news