Pune Politics: वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यात करणार शक्तिप्रदर्शन

बालेवाडीत मंगळवारी भव्य कार्यक्रम; प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली मैदानाची पाहणी
Pune Politics
वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यात करणार शक्तिप्रदर्शनPudhari
Published on
Updated on

पुणे: पक्षात फूट पडल्यावर महायुतीत सहभागी होणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26 वा वर्धापन दिन बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलात जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 10 जूनला होणार्‍या या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्धापन दिनाचा सोहळा भव्यदिव्य केला जाणार आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.

बालेवाडी येथे होणार्‍या कार्यक्रमस्थळाची सुनील तटकरे यांनी शुक्रवारी पाहणी केली. या वेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  (Latest Pune News)

Pune Politics
Pune Crime: पोलिसानेच उकळली 28 हजारांची खंडणी; बोपदेव घाटातील प्रकार

या वेळी त्यांनी वर्धापनदिनाच्या सोहळ्याची माहिती दिली. या प्रसंगी पक्षाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, शिवाजी गर्जे, सुरेश घुले, पुणे शहर (पूर्व) विभागाचे अध्यक्ष सुनील टिंगरे, पश्चिम विभागाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष योगेश बहल, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, पक्षाचे शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

तटकरे म्हणाले की, महायुतीच्या माध्यमातून लोकसभा, विधानसभा निवडणूक लढविणार्‍या राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेसला महाराष्ट्रातील नागरिकांनी बहुमत दिले आहे. या यशानंतर पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.

Pune Politics
Local Bodies Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निर्णय राज्यपातळीवर ठरेल; अजित पवार यांची माहिती

विधानसभा निवडणुकीच्या यशानंतरचा हा पहिलाच वर्धापनदिन असल्याने यंदाच्या वर्षीचा सोहळा भव्यदिव्य करण्याचे नियोजन आहे. यासाठी संपूर्ण राज्यातून पक्षाचे महत्त्वाचे पदाधिकारी, आमदार उपस्थित राहणार आहे. पक्षाचे नेते अजित पवार हे मार्गदर्शन करणार असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.

विकृतांना पक्षात स्थान नाही

पक्षाचा कोणताही कार्यकर्ता हा विकृत मनोवृत्तीचा व गुन्हेगारी प्रवृत्तीचा राहणार नाही. अशांना पक्षात कोणतेही स्थान दिले जाणार नाही. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी राष्ट्रवादीचे पदाधिकारी असल्याचे समोर आल्यानंतर पक्षाने त्यांची तातडीने हाकलपट्टी केली. वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात यावर सविस्तर चर्चा केली जाणार असून, विकृत गुन्हेगारी ठेचून काढण्यासाठी पक्ष प्रयत्नशील आहे, असे तटकरे यांनी या वेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news