

पुणे: बॅगेत हुक्का स्पॉट आढळल्यानंतर, कारवाई करण्याच्या धमकीने पोलीस कर्मचाऱ्याने 28 हजार रुपयांची खंडणी उकळली आहे. विक्रम वडतीले असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचे नाव आहे.
गुन्हा दाखल होताच कर्मचाऱ्याला पोलिस खात्यातून निलंबित देखील करण्यात आले आहे. तक्रारदार तरुण हा चेन्नई येथील राहणारा असून, तो त्याच्या मित्रासह बोपदेव घाट परिसरात फिरण्यासाठी आला होता. (Latest Pune News)
वडतीले यांनी तरुणाला कारवाई करण्याच्या धमकीने सुरुवातीला तीस हजार रुपये मागितले होते. त्यानंतर त्याचा मित्र केदार जाधव याच्या गुगल पे वरती 28 हजार रुपये स्वीकारले. दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर , तरुणाने कोंढवापोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार वडतीले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.