पुणे : ‘तुकाराम महाराज केसरी’चा मानकरी ठरला पै. कोकाटे

पुणे : ‘तुकाराम महाराज केसरी’चा मानकरी ठरला पै. कोकाटे
Published on
Updated on

येरवडा : पुढारी वृत्तसेवा :  लोहगाव येथील संत तुकाराम महाराजांच्या उत्सवानिमित्त आठवडे बाजार परिसरात कुस्ती आखाड्याचे आयोजन केले होते. यात प्रथम क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पै. माऊली कोकाटे यांच्यात झाली. यात पै. कोकाटे याने पै. पाटील याला चितपट करीत जगद्गुरू संत तुकाराम महाराज केसरी चांदीची गदा व दोन लाख रुपये रोख इनाम पटकाविला.

पंच गावकरी सार्वजनिक रायबा तालीमच्या वतीने 1 ते 25 निकाली कुस्त्या घेण्यात आल्या. यात महाराष्ट्र केसरी पै. प्रकाश बनकर विरुद्ध पै. शैलेश शेळके, मुळशी केसरी मुन्ना झुंजारके विरुद्ध नॅशनल चॅम्पियन आशिष हुड्डा, महान भारत केसरी शुभम सिंधनाळे विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन वैभव माने यांच्यात कुस्त्या झाल्या. या आखाड्यात हिंद केसरी पै. अभिजित कटके, महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे यांचा सन्मान करण्यात आला.

माजी आमदार बापूसाहेब पठारे, अशोक खांदवे, राजेंद्र खांदवे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे, रायबा तालमीचे अध्यक्ष सोमनाथ मोझे, हरिदास मोझे, शरद खांदवे, नीलेश पवार, विश्वास खांदवे, सुरेश शेजवळ, दीपक मोझे, मिलिंद खांदवे, माऊली पवार, सुभाष काळभोर आदी उपस्थित होते. निवेदन हानंगेश्वर धायगुडे यांनी केले.

आजोळ ट्रस्टच्या वतीनेही कुस्ती स्पर्धा दरम्यान, संत तुकाराम महाराज आजोळ ट्रस्टच्या वतीने कुस्त्या याच आखाड्यात घेण्यात आल्या. 1 हजार ते 2 लाखांपर्यंत बक्षिसे ठेवण्यात आली होती. शेवटची कुस्ती पै. अक्षय शेळके वि. पै. अक्षय मदने यांच्यात बरोबरीत झाली. भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी आमदार बापूसाहेब पठारे, माजी उपसभापती संतोष लाला खांदवे, प्रीतम खांदवे, सुनील खांदवे, मोहनराव शिंदे, प्रकाश खांदवे, रामभाऊ खांदवे, संदीप लांडगे, विकास भुकन, दादा निंबाळकर, अविनाश मोझे व नागरिक उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news