पिंपरी : गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ‘आरटीओ’ मालामाल

पिंपरी : गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ‘आरटीओ’ मालामाल

राहुल हातोले

पिंपरी : गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर नागरिकांनी खरेदी केलेल्या वाहनांच्या नोंदणीमधून पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन विभागाला तब्बल 32 कोटींचे उत्पन्न मिळाले असून, हे उत्पन्न गेल्या वर्षीच्या दिवाळीपेक्षा तीन पटीने अधिक आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर नागरिक नवीन वस्तुंची खरेदी करतात. 15 ते 22 मार्च या कालावधीत खरेदी केलेल्या वाहनांच्या नोंदणीमधून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला 32 कोटी 23 लाख 14 हजारांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. गेल्या दिवाळीमध्ये वाहनांच्या नोंदणीमधून आरटीओला दोन दिवसांमध्ये 9 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. मात्र, यावर्षी पाडव्याच्या मुहूर्तावर दिवाळीपेक्षा तिपटीने उत्पन्न प्राप्त झाले आहे.

पाडव्याच्या मुहूर्तावर नोंद झालेली वाहने
दुचाकी 2831 चारचाकी 1735
अवजड वाहने 171 तीन चाकी 82
ट्रॅक्टर 59 इतर 114

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर शहरातील नागरिकांनी उत्साहात नव्या वाहनांची खरेदी केली आहे. यामध्ये दुचाकी वाहनांची सर्वाधिक खरेदी झाली. यामुळे आरटीओच्या उत्पन्नात भर पडली आहे.

 – मनोज ओतारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड शहर.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news