file photo
file photo

चाकण : कामगारांकडून खंडणी मागणार्‍यावर गुन्हा

चाकण(ता. खेड); पुढारी वृत्तसेवा : चाकण औद्योगिक वसाहतीतील निघोजे येथील महिंद्रा लॉजेस्टिक या कंपनीतील माथाडी कामगारांकडून खंडणी उकळली जात असल्याची बाब समोर आली आहे. महाळुंगे इंगळे पोलिसांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. 10) देहू येथील एकावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

सचिन नारायण कोरडे (वय 35, रा. धाडगेमळा, चाकण) यांनी याप्रकरणी महाळुंगे इंगळे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सचिन यांच्या फिर्यादीवरून स्वप्निल सोबळे (रा. देहूगाव, ता. हवेली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निघोजे येथील महिंद्रा लॉजेस्टिक कंपनीत माथाडी कामगार स्वप्निल सोबळे याने इतर माथाडी कामगार यांच्यासोबत काम न करता कामावर फक्त हजेरी लावली.

मागील वर्षाच्या सप्टेंबर 2022 ते नोव्हेंबर 2022 या कलावधीत कंपनीत माल घेऊन आलेल्या वाहनचालक यांच्याकडून वाहनातील माल उतरविण्याच्या कामाची मजुरी रक्कम स्वीकारली. ती रक्कम तो माथाडी बोर्डात न भरता प्रत्येक दिवसाला हजार ते दीड हजार रुपये स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी घेत होता तसेच कंपनीत येणार्‍या वाहनचालक यांच्याकडून अतिरिक्त जादा पैसे हप्ता म्हणून वसूल
करीत होता.

सचिन कोरडे यांनी याबाबत सोबळे यास जाब विचारला असता त्यास स्वप्निल सोबळे याने शिवीगाळ, दमदाटी करीत हाताने, लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी सोबळे याच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

logo
Pudhari News
pudhari.news