महत्वाची बातमी : शिवाजीनगर, डेक्कनची उद्या दोन तास वीज बंद

महत्वाची बातमी : शिवाजीनगर, डेक्कनची उद्या दोन तास वीज बंद
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : औंध ते रावेत बीआरटी रस्त्यावरील महापारेषणच्या 132 केव्ही अति उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांसाठी नवीन मनोरे उभारणीचे व इतर दुरुस्तीचे पूर्वनियोजित दुसर्‍या टप्प्यातील काम रविवारी (दि. 4) सकाळी 6 ते 8 पर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन तासांत शिवाजीनगर व डेक्क्नमधील काही परिसराचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. नवीन मोनोपोल टॉवर उभारण्याचे दुसर्‍या टप्प्यातील उर्वरित काम रविवारी (दि. 4) सकाळी 6 ते 8 वाजेदरम्यान पूर्ण करण्यात येणार आहे.

त्यामुळे एफसी रस्ता, वाकडेवाडी, मॉडेल कॉलनी, मोदीबाग 1, रेंजहिल्स, ई-स्क्वेअर, वडारवाडी, गोखलेनगर, लकाकि रस्ता, सेनापती बापट रस्ता, हनुमाननगर, मंगलवाडी, वेताळबाबा चौक, राजभवन, खैरेवाडी, अशोकनगर, यशवंत घाडगेनगर, पोलिस लाइन वसाहत, घोले रस्ता, शिवाजीनगर गावठाण, काँग्रेस भवन, सावरकर भवन, जिल्हा न्यायालय, कामगार पुतळा, तोफखाना, मंगला टॉकीज, आयआयटीएम, कॅस्टेल रॉयल टॉवर, काकडे मॉल, एसएसपीएमएस कॉलेज, रेव्हेन्यू कॉलनी, आकाशवाणी, शिमला ऑफिस, सीआयडी वसाहत, संचेती हॉस्पिटल, लक्ष्मी रस्ता, नारायण पेठ, शनिवार पेठ व सदाशिव पेठचा काही भाग, चित्रशाला, आपटे रस्ता, शिरोळे रस्त्याचा अर्धा भाग, जंगली महाराज रस्ता, पुलाची वाडी, छत्रपती चौक, आयएमडीआर कॉलेज, गणेशवाडी आदी परिसरात दोन तास वीजपुरवठा बंद राहणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news