Vehicle Choice Number: ...आता फॅन्सी चॉइस नंबर घरबसल्या मिळणार!

पसंती क्रमांकासाठी आरटीओत जाण्याची गरज नाही
Vehicle Choice Number
...आता फॅन्सी चॉइस नंबर घरबसल्या मिळणार!
Published on
Updated on

Pune News: आपल्या पसंतीच्या गाडीला आता घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने फॅन्सी चॉइस नंबर मिळविता येणार आहे. राज्यभरातील आरटीओमध्ये ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून ओटीपीच्या साहाय्याने ऑनलाइन पेमेंट करून ऑनलाइनच वाहन क्रमांक मिळवता येणार आहे. आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही.

अनेक वाहनचालक लकी नंबर किंवा जन्मदिवसाची तारीख ही नंबर प्लेटच्या माध्यमातून गाडीला लावण्यासाठी आग्रही असतात. यासाठी परिवहन विभागाकडूनदेखील पैशांची आकारणी केली जाते. आवडीचा क्रमांक हवा असेल, तर त्यासाठी विशीष्ट रकमेचा धनादेश भरून तो आरटीओ कार्यालयात जमा करावा लागतो. त्यानंतर हा नंबर संबंधित वाहनधारकासाठी राखीव करून ठेवण्यात येतो.

Vehicle Choice Number
राज्यातील ई-सर्च यंत्रणा ठप्प; टायटल रिपोर्टअभावी कामे रखडली

मात्र, एकाच नंबरसाठी दोन वाहनधारकांचे धनादेश आल्यास त्यातील सर्वाधिक रकमेच्या धनादेश धारकाला तो वाहन क्रमांक दिला जातो. यासाठी आरटीओ कार्यालयात लिलाव पद्धतदेखील आहे. आरटीओच्या या चॉइस नंबर प्रक्रियेतून परिवहन विभागाला चांगला महसूल प्राप्त होतो. मात्र, या सर्व प्रक्रियेसाठी नागरिकांना आरटीओत जावे लागत होते.

आता घरबसल्या नागरिकाना असे नंबर घेता येणार आहेत. दरम्यान, चॉइस नंबर बुकिंग ऑनलाइन पद्धतीने सुरू झाल्यानंतरही लिलाव मात्र पूर्वीप्रमाणे ऑफलाइन राहणार आहे. नोंदणी क्रमांकाची नवीन सिरीज खुली होण्यापूर्वी क्रमांकासाठी लिलाव होतो. यामध्ये राखून ठेवण्यात आलेले नंबर वगळता इतर नंबर हे ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सोमवारपासून ही सुविधा सुरू झाली असून, काही तांत्रिक अडचण आल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आरटीओ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Vehicle Choice Number
Pune Politics: महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसपुढे आव्हानांचा डोंगर

अशी करा प्रक्रिया

  • परिवहन विभागाच्या एचटीटीपी:///फॅन्सी.परिवहन. जीओव्ही.इन/ या संकेतस्थळावर जा.

  • न्यु युझरवर क्लिक करा आणि रजिस्ट्रर करा.

  • रजिस्ट्रेशन कम्प्लेट करण्यासाठी ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक टाका.

  • मोबाईल क्रमांकावर युझर आयडी आणि पासवर्ड प्राप्त होईल.

  • नंतर चॉइस क्रमांकासाठी अ‍ॅप्लीकेशन करा.

  • त्यानंतर ऑनलाइन पेमेंट करा.

  • पेमेंट केल्यावर पैसे भरलेली पावती प्राप्त होईल.

  • ही पावती संबंधित वाहन विक्रेत्याला द्या.

फॅन्सी क्रमांक नागरिकांना घर बसल्या 24 तासांत मिळवता येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. या फेसलेस सुविधेमुळे वाहन क्रमांकासाठी कार्यालयात येण्याची गरज लागणार नाही. मात्र, वाहनमालकांनी पावती फाडताना कोणतीही स्पेलिंग मिस्टेक करू नये. व्यवस्थित अर्ज करावा. ऑनलाइन पावती प्राप्त करून घ्यावी.

- स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news