आता एमबीए, एमसीए एकात्मिक अभ्यासक्रमांसाठीही सीईटी

आता एमबीए, एमसीए एकात्मिक अभ्यासक्रमांसाठीही सीईटी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलमार्फत यंदापासून एमबीए आणि एमसीए एकात्मिक अभ्यासक्रमांसाठीही सीईटी परीक्षा लागू केली आहे. त्यासाठीची नोंदणी आणि अभ्यासक्रमासंदर्भात सीईटीसेलने निर्देश दिले आहेत. त्यानुसार बीबीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएमची सीईटीच संबंधित अभ्यासक्रमांसाठी लागू करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शैक्षणिक वर्ष 2024-25 करीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत बीबीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता घेण्यात येणार्‍या महा-बी. बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम सीईटी 2024 ही सामाईक प्रवेश परीक्षा राज्यात प्रथमच होणार आहे.

त्याचप्रमाणे एमबीए इंटीग्रेटेड आणि एमसीए इंटीग्रेटेड या अभ्यासक्रमांना शैक्षणिक वर्ष 2024-25 प्रवेशासाठी महा-बीबीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम सीईटी 2024 या सामाईक प्रवेश प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष 2024-25 करीत ज्या उमेदवारांना एमबीए इंटीग्रेटेड आणि एमसीए इंटीग्रेटेड या अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचे आहेत अशा उमेदवारांनी संबंधित सीईटी देणे अनिवार्य आहे. संबंधित सीईटीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू असून, उमेदवारांना येत्या 18 एप्रिलपर्यंत नोंदणी करता येणार आहे.

परीक्षेची तारीख नंतर कळवणार

महा-बी. बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम सीईटी 2024 एमबीए इंटीग्रेटेड आणि एमसीए इंटीग्रेटेड या सामाईक प्रवेश परीक्षेची तारीख निश्चित झाल्यानंतर उमेदवार व पालकांच्या माहितीस्तव www. mahacet. org  या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे सीईटीसेलने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news