भ्रष्टाचार न करणार्‍याला भाजपमध्ये स्थान नाही : खासदार संजय राऊत

भ्रष्टाचार न करणार्‍याला भाजपमध्ये स्थान नाही : खासदार संजय राऊत

खोर : पुढारी वृत्तसेवा : जो राजकीय नेता कोटींच्या घरात भ्रष्टाचार करणार नाही त्याला भाजपात स्थान दिले जाणार नाही, असा आरोप शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. भीमा सहकारी साखर कारखान्यात कथित 500 कोटी रुपयांचा भ—ष्टाचार दौंडचे आमदार व कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांनी केल्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर वरवंड येथे शेतकरी कृती समितीच्या मेळाव्यात ते बोलत होते. संजय राऊत म्हणाले की, आम्हाला कारखान्यावर जाण्यास व स्वर्गीय मधुकर शितोळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यास 144 कलम लागू करून आमची अडवणूक करण्यात आली.

ही कारखान्याच्या तब्बल 49 हजार सभासदांची अडवणूक आहे. आमदार कुल यांच्याशी माझे व्यक्तिगत भाडण नाही, मात्र 500 कोटी रुपयांचा जो भ्रष्टाचार केला आहे त्याचे उत्तर त्यांनी द्यावे. भीमा-पाटस आज भंगारात जात आहे आणि देवेंद्र फडणवीस आपल्या लाडक्या आमदाराला पाठीशी घालत आहेत. आप मिस्टर कुल है तो….मै मिस्टर हॉट हू..! असा टोला मारत राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील कारखाना निराणीला देताना सभासदांना विचारले का ? 50 हजार सभासदांनी मिळून राहुल कुल यांच्यावर वर 420 कलम अंतर्गत गुन्हा दाखल करावा. जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत मी तुमच्या पाठीशी असणार आहे. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे, कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर, वैशाली नागवडे यांची भाषणे झाली. अप्पासाहेब पवार, तुषार थोरात, सायली दळवी, राहुल दिवेकर, प्रदीप दिवेकर, अनिल सोनवणे, योगिनी दिवेकर, मीनाक्षी दिवेकर आणि शरद सूर्यवंशी उपस्थित होते.

कारखानास्थळावर जमावबंदीचा आदेश
खासदार संजय राऊत यांच्या सभेने दौंड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. याचा परिणाम म्हणाजे भीमा-पाटस साखर कारखानास्थळावर जमावबंदीचा आदेश जारी केला होता. पुरंदर – दौंडचे विभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी हा आदेश काढला. राऊत सभेच्या ठिकाणी येण्यापूर्वी कारखानास्थळावरील संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय मधुकरराव शितोळे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी जाणार होते. या वेळी कारखानास्थळी गोंधळ होऊ नये म्हणून कारखानास्थळी हा आदेश जारी करण्यात आला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news