कामशेत : कोंडेश्वर मंदिर परिसरही शांत

कामशेत : कोंडेश्वर मंदिर परिसरही शांत

कामशेत : जून महिना संपला असून अजूनही पावसाने जोर धरला नाही. त्यामुळे नाणे मावळ व परिसरातील पठारी भागातील निसर्ग पाहण्यासाठी देखील अजून त्यामधील पठारी भाग हे पावसाचे आगार मानले जाते. पण जून महिना स़पंत आला तरी पावसाने जोर धरला नाही. त्यामुळे पर्यटकांनी नाणे मावळा कडे पाठ फिरवली. नाणे मावळ हे पर्यटकांचे आकर्षण आहे.नाणे मावळातील कोंडेश्वर मंदिर व

तेथील नयनरम्य परिसर व त्या मंदिराच्या परिसरात जे डोंगर आहे त्या डोंगरातून वाहणरे धबधबे व हे डोळ्यांचे पारणे फिटणारे निसर्गरम्य परिसर शिवाय कोंडेश्वर कडे जाताना थोरण, शिरदे या भागातील रस्त्यांच्या बाजूला असणार्‍या डोंगरातून वाहणारे पाणी धबधबे या मध्ये भिजण्याचा आनंद घेणारे दरवर्षी पर्यटक या वर्षी फिरेनासे झाले आहे.

गेली दोन वर्षे कोरोना मुळे पर्यटक फिरकले नाहीत या वर्षी पावसानेे दडी मारल्याने पर्यटकांची संख्या रोडावली याचा परिणाम ग्रामीण भागातील जनजीवनावर झालेला आढळून येत आहे.पर्यटकांमुळे छोटे व्यावसायिक व यांच्या व्यवसायांवर परिणाम झाला आहे.
गेली दोन दिवस पाऊस पडत आहे पण हा पडणारा पाऊस जोरदार नसल्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने पोषक असे वातावरण निर्माण झाले नाही जर पावसाचा जोर वाढला तर पर्यटकांना नाणे मावळातील निसर्गरम्य परिसराचा आनंद घेता येईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news