पुणे : पालिकेचे हंगामी शिक्षक तीन महिने वेतनाविनाच, इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांची दिवाळी ‘कडू’च

पुणे : पालिकेचे हंगामी शिक्षक तीन महिने वेतनाविनाच, इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांची दिवाळी ‘कडू’च

पुणे : महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील शिक्षकांना गेल्या तीन ते चार महिन्यांपासून वेतनच दिले गेले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या शिक्षकांची दिवाळी कडूच झाली आहे.

पुणे महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या एकूण 55 शाळा आहेत. या शाळेमध्ये 2015 पासून हंगामी तत्त्वावर शिक्षकभरती राबवली जाते. त्यांना 15 हजार वेतन दिले जाते. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून त्यांना वेतनच दिले गेले नसल्याची तक्रार हंगामी शिक्षक प्रवीण खेडेकर यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. तसेच, शिक्षणप्रमुख मीनाक्षी राऊत यांनाही यासंबंधीचे दिवाळीत निवेदन दिले आहे. मात्र, त्यानंतरही दिवाळीत या शिक्षकांना वेतन अदा होऊ शकलेले नाही.

त्यामुळे या शिक्षकांवर आत्मदहनाची वेळ आल्याचे शिक्षकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. एकीकडे महापालिकेच्या सर्व कर्मचार्‍यांना घसघशीत दिवाळी बोनस मिळाला, मात्र हंगामी शिक्षकांना हक्काच्या वेतनापासून आणि सुट्यांपासूनही वंचित ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत शिक्षणप्रमुख राऊत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news