पुणे : तळजाईवर यापुढे फक्त वृक्षारोपण; सिमेंटची कामे नाही

पर्यावरण प्रमींनी दिलेले निवेदन स्विकारतानावन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.
पर्यावरण प्रमींनी दिलेले निवेदन स्विकारतानावन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.

पुणे : पुढारी वृत्तसेवा

तळजाई वन उद्यानात यापुढे फक्त वृक्षारोपण होईल. कोणत्याही प्रकारची सिमेंट काँक्रिटची कामे होणार नाहीत. सहकारनगर परिसरातील काही लोकांनी समाज माध्यमात अफवा पसरविल्या आहेत, त्यावर विश्वास ठेवू नका. तळजाईवर सिमेंटचे रस्ते आणि फुटपाथ तयार करण्यासाठी तयार करण्याचे कोणतेही नियोजन नाही. तळजाई टेकडी जंगल आहे, ती जंगलच राहील, अशी ग्वाही वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नागरिकांना दिली.

भरणे म्हणाले, सहकारनगर परिसरातील काही सोशल मीडिया गटांवर तळजाईवर सिमेंटचे रस्ते आणि त्या रस्त्याच्या बाजूने फुटपाथ तयार करण्यात येणार आहेत, अशी अफवा सुरू आल्याचे वनमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. या विषयी त्यांनी बुधवारी सकाळी टेकडीवर नियमित येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला.

तळजाई प्रेमींनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. यापुढे कोणतीही सिमेंट काँक्रीटची कामे होणार नाहीत. तळजाईवर फक्त देशी झाडांची लागवड होईल. पुढील शंभर वर्ष तळजाई हिरवीगार, स्वच्छ, सुंदर राहील आणि पुणेकरांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध करून देईल. पशु पक्षांना मोठ्या प्रमाणात खाद्य उपलब्ध होईल, अशा प्रकारच्या झाडांची लागवड पावसाळ्यात केली जाईल. यापुढे तळजाईवरील विकास कामांमध्ये स्थानिक नागरिकांना सहभागी करून घेतले जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी नागरिकांना दिली.

वृक्ष लागवडी विषयी फ्लेक्स लावण्याचे लावण्याचे आदेश

येत्या पावसाळ्यात टेकडीवर वृक्ष लावण्यात येणार आहेत. किती क्षेत्रावर आणि कोणत्या प्रकारचे किती वृक्ष लावण्यात येणार आहेत, या विषयीची सविस्तर माहिती तळजाई टेकडीच्या दर्शनी भागात लावण्यात यावी, असे आदेश भरणे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news