Niti Aayog Report: राज्यातील 50 टक्के तालुके मागास; 358 पैकी 177 तालुक्यांची गतीमानता सर्वच बाबतीत कमी

आरोग्य शिक्षण,कृषी, पायाभूत सुविधा, अशा 40 निकषांच्या आधारे होणार विकास
Niti Aayog Report
Niti Aayog ReportPudhari
Published on
Updated on

शिवाजी शिंदे

पुणे: राज्यातील तब्बल पन्नास टक्के तालुके मागास असून 358 पैकी 177 तालुके अनेक बाबतीत पिछाडीवर असल्याचा अहवाल निती आयोगाने दिला आहे. हे सर्व मागास तालुके आगामी काही वर्षात प्रगत शहरांच्या बरोबरीने विकसित करण्याचा आराखडा निती आयोगाने केला असून राज्याच्या नियोजन विभाग या कडे लक्ष देणार आहे.

देशातील मागासलेल्या पाचशे तालुक्यांचा विकास आराखडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 जानेवारी 2023 रोजी जाहीर केला होता. त्या योजनेचाच हा भाग आहे. राज्याच्या संतुलित आणि सर्वांगींण विकासाला गती यावी त्यादृष्टीने राज्याच्या एकूण 36 जिल्ह्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. तेव्हा 34 जिल्ह्यातील 177 तालुके मागास असल्याची गंभीर बाब पुढे आली.

अनेक बाबतीत महाराष्ट्र हे देशातील अग्रेसर राज्य मानले जाते. अशा आर्थिक दृष्ट्या प्रगतीपथावर असलेल्या राज्यातील पन्नास टक्के तालुके मागास असल्याचे चित्र धक्कादायक आहे. या सर्व तालुक्यांकडे विशेष लक्ष देण्याचा निर्णय निती आयोगाने घेतला आहे. त्यासाठी स्वंतत्र योजना तयार केली असून त्यानुसार मागे पडलेल्या या तालुक्यांना प्रगतीपथावर आणण्यात येणार आहे.

Niti Aayog Report
Ramabai Ambedkar Memorial: रमाई आंबेडकर स्मारक उभारणीस 19 कोटी 36 लाख; स्थायी समितीकडून विविध कामांना मान्यता

हे आहेत 34 जिल्ह्यातील 177 मागास तालुके

- बीड:- बीड, आबेजोगाई, केज, माजलगाव, परळी, पाटोदा, आष्टी, शिरूर कासार, धारूर, गेवराई, वडवणी

-धाराशिव :- तुळजापूर, उमरगा, परांडा, वाशी, कळंब, भूम,लोहारा

-धुळे :- सिंदखेडा, साक्री, शिरपूर

-गडचिरोली :- भामरागड, अहेरी, कोरची, एटापल्ली,सिरोंचा,मूलचेरा, पूरखेडा,धानोरा, गडचिरोली, चामोसी, आरमोरी, देसाईगंज (वडसा),

-हिंगोली: - शेलगाव, औंढा (नागनाथ ),हिगोली

-जालना :- कंळबोली, वसमत, मंठा, अंबड, परतुर, घनसांगवी, बदनापूर, भोकरधन, जाफराबाद,

-नंदुरबार :- अकरानी, अक्कलकुवा, तळोदा,शहादा, नवापूर

-पालघर :-जव्हार, मोखाडा, डहाणू, वाडा, विक्रमगड, पालघर, वसई, तलासरी,

-परभणी- पात्री, जिंतूर, शेलू, सोनपेट, मानवत, गंगाखेड, पालम,पूर्णा

-वाशिम:- मंगळूरपीर, कारंजा, रिसोड, मानोरा, मालेगाव

-अहिल्यानगर:- अकोले, कर्जत, शेवगाव, पारनेर,

-अकोला :- बाळापूर, बार्शी टाकळी

-अमरावती :- धारणी, चिखलदरा, भातकुली, धामणगाव रेल्वे, चांदुर रेल्वे, चांदुरबाजार, नांदगाव,

-भंडारा :- लाखणी, पवनी, साकोली, लाखंदुर,

-बुलढाणा :- जळगाव जामोद्, संग्रामपूर, मेहकर, सिंदखेडराजा, नांदुरा, मोताळा,

-चंद्रपूर:- चिमूर, गोंडपिंपरी, जीवकी, सावली, नागभिड, राजुरा, मूल, पोर्भुर्णा, शिंदेवाही,

-छत्रपती संभाजीनगर: -सोयगाव, खुलताबाद, कन्नड, फुलंब्री, सिल्लोड

- गोंदिया :- देवरी, सालेकसा, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव,

-जळगाव :-पारोळा, एरंडोल, बोदवड, भडगाव,

-कोल्हापूर:- गगनबावडा,

-लातूर :- जळकोट, निलंगा, देवणी, उदगीर, शिरूर अंनतपाळ,

-नागपूर:- भिवापूर

Niti Aayog Report
Pimpri Chinchwad News: घोषणांचा पाऊस, पण विकास कुठे? पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; घोटाळ्यांची मालिका सुरुच

नांदेड :- किनवट, कंदार, माहूर, मुखेड, लोहा, नायगाव, बिलोली, उमरी,

-नाशिक :- त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, कळवंड, इगतपूरी,

-पुणे :- वेल्हे, आंबेगाव,

-रायगड :- सुधागड, पोलादपूर, महाड, मसळा, मानगाव,श्रीवर्धन

-रत्नागिरी :- राजापूर, लांजा,

-सांगली : -जत, आटपाडी, शिराळा

-सातारा :- पाटण

-सिधुदुर्ग :- देवगड,कुडाळ,वैभववाडी, वेगुर्ला

-सोलापूर :- अक्कलकोट,करमाळा,सांगोला,

-ठाणे :- शहापूर, मुरबाडा,

-वर्धा -शेलू, कारंजा, समुद्रपूर, आष्टी,

-यवतमाळ:- झरीजामणी, केळापूर, पुसद, मारेगाव, महागाव, घाटंजी,उमरखेड, दिग्र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news