Nira River : तुडुंब वाहणारी निरा नदी यंदा ओस; निरा खोर्‍यातील धरणांमध्ये 89 टक्के साठा

Nira River : तुडुंब वाहणारी निरा नदी यंदा ओस; निरा खोर्‍यातील धरणांमध्ये 89 टक्के साठा
Published on
Updated on

निरा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या हद्दीवरून वाहणार्‍या निरा नदीत दरवर्र्षी जुलै ते ऑक्टोबर या महिन्यात वीर धरणातून लाखो क्युसेक विसर्ग सोडला जातो. त्यामुळे निरा नदी तुडुंब भरून खळखळून वाहत असते. मात्र, यंदा निरा खोर्‍यात निसर्गाने पाठ फिरवल्याने ऑगस्ट महिना संपला तरी निरा नदी ओस पडली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात निरा नदीच्या पाण्यावर अवलंबून असणारी पिके जळू लागली आहेत. परिणामी, शेतकरी चिंंतातूर झाला आहे.

निरा खोर्‍यात यंदा पाऊस महिनाभर उशिरा सुरू झाला. त्यामुळे यावर्षी निरा खोर्‍यातील बि—टिशकालीन भाटघर धरण, गुंजवणी व वीर धरण सप्टेंबरचा पहिला आठवडा संपावयास आला तरी भरलेले नाही. दरवर्षी निरा खोऱ्यात जुलै महिन्याच्या अखेरीस व ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वीर धरण भरल्यानंतर पाऊस सुरू राहिल्यास वीर धरणातून लाखो क्युसेक प्रतिसेकंद वेगाने विसर्ग निरा नदीत सोडला जात असतो. त्यामुळे दरवर्षी निरा नदीकाठावरील हजारो एकर शेतीला भरपूर पाणी मिळत असते. यंदा सप्टेंबरचा पहिला आठवडा संपत आला, तरी पावसाने ओढ दिल्याने खरिपाची पिके जळून गेल्याचे चित्र दिसत आहे.

यंदा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात निरा खोर्‍यात काही प्रमाणात पाऊस पडल्याने वीर धरणाची पाणी पातळी 8 ऑगस्ट रोजी 89.34 टक्क्यांपर्यंत वाढत गेली. तेव्हापासून निरा डाव्या कालव्यातून 827 क्युसेक व निरा उजव्या कालव्यातून 1550 क्युसेकने खरीप हंगामासाठी आवर्तन सुरू आहे. त्यामुळे 9 सप्टेंबरअखेर वीर धरणात 57.06 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे कालव्यावर अवलंबून असलेल्या शेतकर्‍यांना यंदा उन्हाळी आवर्तन कमी प्रमाणात मिळण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, वीर धरणातून यंदा जून महिन्यापासून 9 सप्टेंबरअखेरपर्यंत निरा नदीत विसर्ग सोडण्यात आला नसल्याने निरा नदी काठावरील शेतकरी चिंतेत आहेत.

निरा खोर्‍यातील धरणांची स्थिती

धरण उपयुक्त पाणीसाठा(टीएमसी) टक्केवारी
निरा देवघर 11.729 100
भाटघर धरण 22.568 96.02
वीर 5.795 57.06
गुंजवणी 3.290 89.18

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news