Prashant Jagtap: 9 मिनिटांचा कॉल! प्रशांत जगतापांना रात्री उद्धव ठाकरेंचा फोन, शिवसेनेची थेट ऑफर, काय चर्चा झाली?

Prashant Jagtap Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी रात्री उशिरा प्रशांत जगताप यांना फोन करून शिवसेनेत येण्याची थेट ऑफर दिली. या नऊ मिनिटांच्या चर्चेत भाजपासोबत कधीही न जाण्याचं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिल्याची माहिती आहे.
Prashant Jagtap Uddhav Thackeray
Prashant Jagtap Uddhav Thackeray Pudhari
Published on
Updated on

Prashant Jagtap Uddhav Thackeray Phone Call: शरद पवारांचे निष्ठावंत नेते मानल्या जाणाऱ्या प्रशांत जगताप यांना काल रात्री उद्धव ठाकरे यांनी ऑफर दिली होती. रात्री उशिरा उद्धव ठाकरे यांनी प्रशांत जगताप यांना फोन केला. शिवसेनेमध्ये या तुमचा योग्य सन्मान राखू, अशी ऑफर उद्धव ठाकरे यांनी प्रशांत जगताप यांना दिली होती. रात्री उशिरा नऊ मिनिट या दोघांमध्ये चर्चा झाली अशी माहिती आहे. आम्ही भाजपा सोबत कधीच जाणार नाही असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी प्रशांत जगताप यांना दिले आहे.

त्यानंतर आता प्रशांत जगताप काय निर्णय घेतील याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे, कालपासून चर्चा होती की प्रशांत जगताप एकतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील किंवा काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. आज सकाळी त्यांचा काँग्रेस प्रवेश होणार आहे, अशी माहिती मिळत आहे.

ज्या विचारधारेवरती प्रशांत जगताप यांनी तडकाफडकी पक्षाचा राजीनामा देऊन टाकला त्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यांना फोन केल्याची माहिती आहे. भाजपा सोबत किंवा भाजपा सोबत असलेल्या मित्र पक्षांसोबत जाऊ नये ही त्यांची ठाम भूमिका होती. तीच भूमिका उद्धव ठाकरे यांनी फोन करून प्रशांत जगतापांना सांगितली.

तुम्ही आमच्या सोबत या आम्ही कधीही भाजपा सोबत जाणार नाही, असा शब्द सुद्धा काल रात्री प्रशांत जगताप यांना उद्धव ठाकरे यांनी दिलेला होता. मात्र अगोदरच त्यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित झालेला आहे. मात्र हा माझा सन्मान आसल्याची प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी दिली आहे. त्यामुळे भविष्यात पुण्यात काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे एकत्र लढू शकतात आणि एक वेगळं राजकीय समीकरण पुण्यात सुद्धा पाहायला मिळू शकतं.

कारण या सगळ्या फोनमधून जे संबंध निर्माण झालेले आहेत, त्यामुळे नवीन काही राजकीय समीकरणे पुण्याला पाहायला मिळतात का हे पाहणं महत्त्वाच आहे. मात्र प्रशांत जगताप यांची निष्ठा पाहून उद्धव ठाकरे यांनी फोन केला होता अशी चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news