पुणे : नऊ सराईत गुन्हेगार शहरातून तडीपार

पुणे : नऊ सराईत गुन्हेगार शहरातून तडीपार

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  दंगा, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरीसह इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या 9 सराईत गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व ग्रामीण परिक्षेत्रातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. शहर परिसरात मागील काही दिवसांत कोयताधारी आरोपींनी दहशत माजविली आहे. अनेक भागांत वाहनांची तोडफोड, जबरी चोर्‍या, लूटमार अशा घटना घडत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत.

त्यानुसार पाटील यांनी त्यांच्या हद्दीतील स्वारगेट, भारती विद्यापीठ, सहकारनगर पोलिस ठाण्यातील रेकॉर्डवरील आणि सातत्याने गुन्हेगारी करणार्‍या सराईतांना तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये स्वारगेट पोलिस ठाण्यातील हिर्‍या उर्फ अजिज सलमान शेख , शंकर नागप्पा निकले, रोशन मिठ्ठू घोरपडे (तिघे, रा. गुलटेकडी), सहकारनगर पोलिस ठाण्यातील महेश अनिल साळुंखे, शुभम सीताराम शिंदे (दोघे, रा. धनकवडी), भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील विशाल बालाजी सोमवंशी, सुजित दत्तात्रय पवार, आकाश रवींद्र उणेचा, सुजित सरपाले अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यापुढेही ठोस कारवाई करण्यात येणार असल्याचे पाटील यांच्याकडून सांगण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news