पुणे : ‘ती’ रोजच होतेय वासनेची शिकार; सावत्र मामाकडून भाचीवर बलात्कार

File Photo
File Photo

पुणे : कोंढवा परिसरात राहणारी 19 वर्षीय मुलगी घरात एकटी झोपलेली असताना सावत्र मामाने तिच्याशी जबरदस्तीने शरीर संबंध ठेवल्याचे आणि घरातील लोकांना जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी 30 वर्षीय सावत्र मामाला अटक केली आहे. ही घटना मार्च 2022 मध्ये घडल्याची तक्रार पीडित तरुणीने पोलिसांना दिली आहे. मामाने याबाबत कोणाला काही सांगितल्यास घरातील लोकांना मारून टाकण्याची धमकी दिली होती.

पीडित तरुणीने घाबरून याबाबत लवकर तक्रार केली नव्हती. परंतु, मामा तिला वारंवार धमकावत होता. त्यामुळे अखेर तिने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news