पुण्यात वर्षभरात 2 लाख 92 हजार नवी वाहने रस्त्यावर

पुण्यात वर्षभरात 2 लाख 92 हजार नवी वाहने रस्त्यावर
Published on
Updated on

पुणे : यंदाच्या आर्थिक वर्षात पुणे शहरामध्ये तब्बल 2 लाख 92 हजार वाहने वाढली आहेत. त्यासोबतच ई-वाहन खरेदीला गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, ई-वाहनांची खरेदीसुध्दा तिप्पट झाली आहे. कोरोनानंतर पुणेकरांनी वाहन खरेदी करण्यावर मोठा जोर दिला असल्याचे दिसत आहे. 2021-22 च्या तुलनेत पुणेकरांकडून 2022-23 या आर्थिक वर्षात तब्बल 2 लाख 92 हजार 259 वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. तर 2021-22 या वर्षात 1 लाख 70 हजार 537 वाहनांची खरेदी करण्यात आली होती. त्यातुलनेत 2022-23 या वर्षात वाहनांची खरेदीमध्ये चांगलीच वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

ई-वाहन खरेदीत तिप्पट वाढ
2021/22 मधील इलेक्ट्रिक वाहने : 9908
2022/23 मधील इलेक्ट्रिक वाहने : 29851

चॉईस क्रमांकालाही मागणी वाढली
2021/22 मध्ये : 222154000/-
2022/23 मध्ये : 360260500/-

अशी झाली वाढ…
अक्र. वाहनप्रकार 2021/22 2022/23
1) दुचाकी 101498 185666
2) कार 51478 76224
3) गुडस 9674 11746
4) अ‍ॅटोरिक्षा 3584 9056
5) बस 350 899
6) अन्य वाहने 3953 8668

2021/22 मधील एकूण वाहने
1 लाख 70 हजार 537
2022/23 मधील एकूण वाहने
2 लाख 92 हजार 259

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news