New Passport Seva Kendra: हडपसर व चाकणच्या नागरिकांची पासपोर्टसाठीची धावपळ थांबणार!

लवकरच सुरू करणार ‘पोस्ट ऑफिस,पासपोर्ट सेवा केंद्रे’
New Passport Seva Kendra
New Passport Seva KendraPudhari
Published on
Updated on

पुणे: पासपोर्ट काढणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या आणि वाढणारे वेटिंग लक्षात घेऊन पारपत्र प्रशासनाने हडपसर व चाकणमध्ये नवीन 'पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रे' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील असे पहिले केंद्र हडपसरला होत असून, त्यामुळे हडपसर येथून बाणेरला पासपोर्टसाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी सोय होणार आहे. प्रादेशिक पारपत्र कार्यालयाने याबाबतचा प्रस्ताव परराष्ट्र मंत्रालयाला सादर केला असून, लवकरच त्याला मंजुरी मिळेल.

New Passport Seva Kendra
Pune Water Tanker SOP: जीपीएस, दरपत्रक, ऑनलाइन बुकिंग अनिवार्य; टँकर व्यवस्थेत मोठे बदल

पासपोर्टसाठी पुणे प्रादेशिक पारपत्र कार्यालयाकडे दररोज १५०० हून अधिक नोंदणी होते. ही संख्या अपेक्षेपेक्षा जास्त असल्याने वेटिंग वाढत आहे. पारपत्रासाठीची पुणे सेवा केंद्रातील अपॉईंटमेंट मिळण्यासाठी सुमारे ३० ते ३५ दिवस लागतात.

हा कालावधी कमी करण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या. तरीही वेटिंग कमी होत नसल्याने पारपत्र प्रशासनाने पुणे शहरातही पोस्ट ऑफिसमध्ये पारपत्र सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला.

New Passport Seva Kendra
Vehicle Removal Drive: पोलिस हटवताहेत वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने; दै. 'पुढारी'च्या मोहिमेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे शहरात हडपसर आणि चाकणमधील पोस्ट ऑफिसमध्ये ही केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. या केंद्रांमुळे तेथील रहिवाशांची सोय तर होईलच, शिवाय पुण्यातील वेटिंग देखील कमी होण्यास मदत होईल, अशी माहिती येथील प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी डॉ. विनोद गायकवाड यांनी दिली.

नागरिकांना त्यांच्या घराजवळ आणि लवकरात लवकर पासपोर्ट सेवा उपलब्ध व्हावी, हा ही केंद्रे सुरू करण्याचा प्रमुख हेतू आहे. हडपसर आणि चाकणमध्ये पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्टची सेवा पहिल्यांदाच उपलब्ध करून दिली जात आहे. त्यासाठीची प्रशासकीय तयारी सुरू असून, येत्या काही महिन्यांतच ही केंद्रे नागरिकांच्या सेवेत दाखल होतील.

- डॉ. विनोद गायकवाड, प्रादेशिक पारपत्र अधिकारी, पुणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news