शिवरस्त्यावर अवैध पार्किंगवर कारवाईचे दुर्लक्ष

शिवरस्त्यावर अवैध पार्किंगवर कारवाईचे दुर्लक्ष

श्रीकांत बोरावके

मोशी : बोर्‍हाडेवाडी – जाधववाडी शिवरस्त्याला बेकायदा वाहनतळाचे ग्रहण लागले असून, अवैध वाहन पार्किंगमुळे वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. येथील वाहनचालकांवर कारवाई करण्याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

मोठ्या प्रमाणात ग्रहप्रकल्प उभारण्यात आलेल्या शिवरस्त्यावर सायंकाळच्या वेळी वाहतूककोंडी नित्याची बाब बनली आहे.पिंपरी मार्केटसारखी स्थिती दररोज सायंकाळी याठिकाणी असते. वाहनचालक आणि विशेषतः चारचाकी वाहनचालक बिनदिक्कत वाहने रस्त्यावर उभी करत येतील दुकाने आणि हॉटेलमध्ये जात असतात. त्याच्या वाहनांमधून जागा काढत पुढे मोशी लक्ष्मीमाता चौकाकडे आणि जाधववाडी रस्त्याकडे वाहनचालक वाहने चालवत असतात.

दुचाकी वाहनांची तर रांगच या रस्त्यावर लागलेली दिसून येते. येथील स्थानिक गृहप्रकल्पांना स्वतःचे वाहनतळ आहेत. त्यामुळे बाहेर रस्त्यावर त्यांच्या गाड्या लागत नाहीत. ही सर्व वाहने खरेदीसाठी किंवा बाहेरून कामानिमित्त आलेल्यांची असतात. ते बेशिस्त णे लावली जातात. त्याचा फटका स्थानिक रहिवाशांना बसतो.

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करावी. नो पार्किंगमध्ये वाहने लावली असल्यास ती हटवावी. अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून पादचार्‍यांना चालण्यासाठी रस्त्याचा वापर करावा लागत आहे
काही ठिकाणी फुटपाथवरच दुकाने थाटली जात असून त्याकडे पालिकेचा संबंधित विभाग दुर्लक्ष करत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news