NEET paper leak | नीट पेपरफुटी प्रकरणी ११ वा आरोपी अटकेत : पुण्यातून भौतिकशास्त्राचे प्रश्न फोडणारी महिला ताब्यात

आरोपी सिबिआयच्या जाळ्यात : मनीषा संजय हवलदार असे आरोपीचे नाव, सराफ प्रशाला येथे कार्यरत,
NEET paper leak |
NEET paper leak | प्रवेश परीक्षांची विश्वासार्हता धोक्यात
Published on
Updated on

पुणे : निट पेपर प्रकरणाची व्याप्ती वाढतच आहे. आज पुण्यातून भौतिकशास्त्राच्या पेपरफुटीप्रकरणी आणखी एका मास्टरमाइंडला अटक. या शिक्षिकेचे नाव मनीषा संजय हवालदार असून तिने फिजिक्सचे प्रश्न लीक केल्याचा आरोप आहे.

याबाबात अधिक माहिती अशी की मनीषा हवालदार यांना सीबीआयने आज पुण्यातून अटक केली. मनीषा सध्या पुण्यातील सेठ हिरालाल सराफ प्रशाला येथे कार्यरत होती..एनटीएने तिला पेपर प्रक्रियेसाठी तज्ज्ञ म्हणून नियुक्त केले होते. त्‍यामुळे तिच्याकडे फिजिक्सच्या प्रश्नपत्रिकेचा ॲक्सेस होता.यापूर्वी अटक झालेल्या मनीषा मांढरेसोबत मिळून तिने फिजिक्सचे काही प्रश्न लीक केले होते.

NEET paper leak |
NEET Paper Leak Impact : नीट पेपरफुटीचा अभियांत्रिकी, फार्मसी प्रवेशांनाही फटका

सिबीआयने तपास केल्यावर सर्व प्रश्न तपासण्यात आले आणि हेच लीक झालेले प्रश्न नीटच्या पेपरमध्ये आल्याचे आढळले. या प्रकरणी आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर येथून ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान रा ष्ट्रीय तपास एजन्सी NTA गुरूवारी संसदीय समितीच्या समोर हजर झाली होती. या संसदीय समितीच्या बैठकीत भाजपने थेट पेपर लीक या टर्मवरच आक्षेप घेतला. या बैठकीत या वर्षीची नीट युजी परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करावी लागली याबाबत चर्चा झाली.

नीट पेपरफुटीबाबतची बैठक ही संसदेच्या शिक्षण, महिला, मुले, युवक आणि क्रीडा समितीसमोर झाली. या समितीसमोर भाजप खासदारांनी पेपर लीक ही टर्म वापरण्यावर आक्षेप घेतला. त्यांनी कार्यवाही आणि अजेंडा या दोघांना देखी लविरोख केला. याबाबतचे वृत्त हिंदूस्तान टाईम्सने दिले आहे. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी भाजपच्या या भूमिकेवर आक्षेप नोंदवला. एनटीए आणि मंत्रालयाने हा पेपर व्यवस्थेतून लीक झाला नसल्याची भूमिका घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news