

पुणे: सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरातर्फे नवरात्रोत्सवात मंदिराशेजारील बाजूस एकदिवसीय रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. मंदिरात येणाऱ्या भाविकांना रक्तदानाचे आवाहन करीत रक्तदानाचे महत्त्व देखील सांगण्यात आले.
मंदिर ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त डॉ. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, ॲड. प्रताप परदेशी, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदींच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला. तर, सामाजिक कार्यकर्ते सदाशिव कुंदेन यांनी शिबिराचे संयोजन केले होते. श्वास फाउंडेशनच्या महा ब्लड सेंटरच्या वतीने शिबिरात सर्व आयोजन करण्यात आले. यामध्ये अनेक भक्तांनी सहभाग घेऊन रक्तदान केले. (Latest Pune News)
डॉ. तृप्ती अग्रवाल म्हणाल्या, रक्तदान हे एक अमूल्य दान असून, ते गरजू लोकांना जीवनदान देते, ज्यामुळे शस्त्रक्रिया, अपघात आणि गंभीर आजारांमध्ये लोकांचे प्राण वाचतात. रक्तदान हा एक सुरक्षित आणि महत्त्वाचा सामाजिक उपक्रम आहे, ज्यामुळे गरजूंना जीवदान मिळते आणि दात्यालाही आत्मिक समाधान मिळते. त्यामुळे धार्मिकतेसोबतच सामाजिकता जपत असे उपक्रम मंदिरातर्फे सातत्याने राबविले जात आहेत.