पुण्यातील खड्ड्यांमुळे अपघातात राष्ट्रीय कुस्तीपटू गंभीर जखमी

22 वर्षीय पैलवानाची मृत्यूशी झुंज
Vijay Doifode Accident
पैलवान विजय डोईफोडेPudhari Photo
Published on
Updated on

पुणे शहरात झालेल्या मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. याच खड्ड्यांचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. पुण्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एका २२ वर्षांच्या पैलवानाची मृत्यूशी झुंज सुरू आहे. विजय डोईफोडे या पैलवानाचा पुण्यातील खड्ड्यांमध्ये पडून अपघात झाला. त्याची प्रकृती आता गंभीर आहे. त्याच्यावर पुण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Vijay Doifode Accident
Paris Olympics Hockey : हरमनप्रीत सिंगच्या गोलचा ‘चौकार’! भारताचा आयर्लंडवर 2-0 ने विजय

कोल्हापुरात कुस्तीचे प्रशिक्षण घेणाऱ्या या २२ वर्षांचा पैलवान विजय डोईफोडेनं आतापर्यंत राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये महाराष्ट्रासाठी पदकांची कमाई केली. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सलग तीन वर्षे तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरला; मात्र मागील आठवड्यात दुखापतींवर उपचार करून घेण्यासाठी पुण्यात आलेल्या विजयचा पुण्यातील स्वारगेट भागात दुचाकी खड्ड्यात आपटून अपघात झाला. यामध्ये त्याच्या डोक्याला जबर मार लागला असून तो बेशुद्ध आहे. त्याच्यावर उपचारांसाठी लाखो रुपयांची गरज असून घरची परिस्थिती बेताची आहे. त्याच्यावर चांगले उपचार व्हावेत यासाठी आर्थिक मदतीचं आवाहन त्याच्या पैलवान मित्रांकडून करण्यात येत आहे. त्यांच्या मित्राने सांगितले की डॉक्टरांच्या म्हणण्यांनुसार एका महिन्याच्या उपचारासाठी तरी ४०-४५ लाखांचा खर्च आहे. त्यामुळे खूप लोकांकडून मदतीची गरज आहे.

Vijay Doifode Accident
अजितदादांना पैलवान चंद्रहार पाटलांचा चकवा; सांगलीत राजकीय ‘दंगल’

विजयने मिळविलेली पदके : पै विजय जिजाबा डोईफोडे

  • ऑल इंडिया युनिव्हर्सिटी कुस्ती स्पर्धा, कोल्हापूर- रौप्य पदक

  • जूनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा पटना, बिहार- कांस्यपदक

  • खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स कुस्ती स्पर्धा, वाराणसी- सुवर्णपदक

  • खाशाबा जाधव वरिष्ठ राज्य कुस्ती स्पर्धा, लातूर - सुवर्णपदक

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ८६ किलो वजन गटात :

  • कोथरूड, पुणे - सुवर्णपदक

  • बालेवाडी, पुणे - रौप्यपदक

  • धाराशिव - रौप्यपदक

  • मिनी ऑलंपिक कुस्ती स्पर्धा, बालेवाडी, पुणे - सुवर्णपदक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news