दस्तनोंदणी शुल्कात अडकली नसरापूर आरोग्य केंद्राची इमारत

दस्तनोंदणी शुल्कात अडकली नसरापूर आरोग्य केंद्राची इमारत

माणिक पवार

नसरापूर : नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था कोंडवाड्याहून अधिक बिकट झाली आहे. पंतसचिवांच्या वाड्यातच हे आरोग्य केंद्र आहे. हे आरोग्य केंद्र चेलाडी येथे स्थलांतरित करण्यासाठी प्रस्ताव संमत झाला आहे. मात्र, हस्तांतरण झालेल्या जागेच्या दस्तनोंदणी शुल्काच्या लाल फितीत नवीन इमारतीची उभारणी अडकली आहे.

नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्रच्या नवीन इमारतीसाठी पुणे-सातारा महामार्गालगत चेलाडी येथील पशुसंवर्धनची जागा वर्षापूर्वी हस्तांतरण करण्यात आली आहे. मात्र, आरोग्य विभागाकडून शुल्क नोंदणीसाठी सुमारे चार लाखांहून अधिक भरले गेले नसल्याने अद्यापही नवीन इमारत उभारणीचे काम प्रलंबित राहिले आहे. तातडीने शुल्क रक्कम भरल्यास नवीन जागी अद्ययावत आरोग्य केंद्र इमारत उभी राहिल्यास सर्वच समस्या दूर होतील.

वैद्यकीय मशिनरीची कमतरता
नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत वेळू, शिवरे, केळवडे, कापूरव्होळ, देगाव, कासुर्डी गु. मा., हातवे बुद्रुक व जांभळी उपकेंद्र येतात. या केंद्राचा ताण असताना नसरापूरमध्ये अनेक वैद्यकीय मशिनरीची कमतरता असून, गंभीर रुग्णांना नाहक ससून येथे उपचारांसाठी हेलपाटे मारावे लागतात.

नसरापूर आरोग्य केंद्राच्या समस्या सोडविण्यासाठी पशुसंवर्धनची जागा हस्तांतरण करण्यात आली. शुल्क नोंदणी रकमेसाठी देखील सर्वसाधारण सभेत पाठपुरावा केला आहे. लवकरच शुल्क नोंदणी रक्कम जमा होणार आहे.

 – शलाका कोंडे, माजी जिल्हा परिषद सदस्या तसेच रुग्णकल्याण समिती अध्यक्षा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news