Nasrapur Case Verdict : "अशा नराधमांना समाजात राहण्याचा अधिकार नाही" : नरसापूर निकालावर CM फडणवीसांनी व्‍यक्‍त केले समाधान

तपास यंत्रणा आणि सरकारी वकिलांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
Nasrapur Case Verdict
Nasrapur Case VerdictPudhari
Published on
Updated on

Nasrapur Case Verdict : नसरापूर येथील चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे (वय 65) याला आज (दि.२९) न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत तपास, पुरावे आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून निकाल देण्यात आला. यामुळे अत्याचार आणि हत्या प्रकरणातील राज्यातील सर्वात जलदगतीने निकाली निघालेल्या खटल्यांपैकी हा एक ठरला आहे. या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले आहे.

'अशा नराधमांना समाजात राहण्याचा अधिकार नाही' : मुख्यमंत्री

नरसापूर येथील खटल्याच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र समाधान व्यक्त केले आहे. "न्यायालयाने अतिशय योग्य निर्णय घेतला असून, अशा नराधमांना समाजात राहण्याचा कुठलाही अधिकार नाही," अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. तसेच, पीडितेला न्याय दिल्याबद्दल त्यांनी न्यायालयाचे मनापासून आभार मानले आहेत.

Nasrapur Case Verdict
Nasrapur Case Verdict: भीमराव कांबळेने हात जोडले; आई-वडिलांच्या डोळ्यांत अश्रू, कोर्टाचे मानले आभार, नेमकं काय काय घडलं?

तपास यंत्रणा आणि सरकारी वकिलांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

हा खटला अत्यंत संवेदनशील असल्यामुळे तो जलदगतीने मार्गी लागणे आवश्यक होते. न्यायालयीन निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि सरकारी वकील अजय मिसर यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले. खटल्यात भक्कम बाजू मांडल्याबद्दल त्यांनी सरकारी वकील अजय मिसर आणि पुणे जिल्हा पोलीस अधीक्षकांचे फोनवरून वैयक्तिकरीत्या अभिनंदन केले.

Nasrapur Case Verdict
Nasrapur Case: नसरापूर चिमुकली हत्या प्रकरणात न्यायालयात साक्ष; महत्त्वाचे पुरावे सादर

1 मे रोजी घडली होती संतापजनक घटना

1 मे रोजी पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या अमानुष घटनेनंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. विविध सामाजिक संघटना, नागरिक आणि राजकीय पक्षांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती. या प्रकरणात न्यायालयाने गुन्ह्याचे स्वरूप, पीडितेचे अल्पवय, अत्याचारानंतर झालेली निर्घृण हत्या आणि समाजावर झालेला परिणाम यांचा सखोल विचार केला. हा गुन्हा 'रेअरेस्ट ऑफ द रेअर' स्वरूपाचा असल्याचे निरीक्षण नोंदवत आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news