Nasrapur Case Verdict: भीमराव कांबळेने हात जोडले; आई-वडिलांच्या डोळ्यांत अश्रू, कोर्टाचे मानले आभार, नेमकं काय काय घडलं?

Nasrapur Case Verdict: नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या भीमराव कांबळेला न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.
Nasrapur Case Verdict
Nasrapur Case VerdictPudhari
Published on
Updated on

Nasrapur Case Verdict: नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या भीमराव कांबळेला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी हा ऐतिहासिक निकाल दिला. गुन्ह्याच्या अवघ्या दोन महिन्यांत खटल्याचा निकाल लागल्याने हा राज्यातील सर्वात वेगाने निकाली निघालेल्या गंभीर गुन्ह्यांपैकी एक ठरला आहे.

शिक्षा जाहीर होताच न्यायालयात काही क्षण शांतता पसरली. आरोपी भीमराव कांबळे याने न्यायालयासमोर हात जोडले. त्याच्या आई-वडिलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. न्यायालयाने दिलेला निर्णय त्यांनी शांतपणे ऐकून घेतला आणि कोर्टाचे आभार मानल्याचेही न्यायालयीन सूत्रांकडून सांगण्यात आले.

या प्रकरणात न्यायालयाने गुन्ह्याचे स्वरूप, पीडितेचे अल्पवय, अत्याचारानंतर झालेली निर्घृण हत्या आणि समाजावर झालेला परिणाम यांचा सखोल विचार केला. हा गुन्हा 'रेअरेस्ट ऑफ द रेअर' स्वरूपाचा असल्याचे निरीक्षण नोंदवत आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

Nasrapur Case Verdict
Ketan Murder Case: केतन हत्याकांडात धक्कादायक ट्विस्ट! साखरपुड्यापूर्वी चेतनसोबत उदयपूर ट्रिप, शॉपिंगसाठी घेतले 1 कोटी?

सरकारी पक्षाने सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयातील अनेक महत्त्वाच्या निर्णयांचा आधार घेत कठोर शिक्षेची मागणी केली होती. न्यायालयानेही भारतीय संविधान आणि भारतीय न्याय संहितेतील तरतुदींनुसार तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा संदर्भ घेत निर्णय दिल्याचे स्पष्ट केले.

1 मे रोजी नसरापूर येथे घडलेल्या या अमानुष घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. पोलिसांनी अल्पावधीत तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर न्यायालयानेही या खटल्याची दैनंदिन सुनावणी घेत जलदगतीने निकाल दिला. या निर्णयानंतर पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news