Pune Crime: नसरापूर चिमुकली अत्याचार-खून प्रकरणात न्यायालयात धक्कादायक साक्ष

आरोपीची ‘न्यायबाह्य कबुली’ आणि ग्रामस्थांची साक्ष नोंद; खटल्यात महत्त्वाची घडामोड
Law
LawPudhari
Published on
Updated on

पुणे: भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण खून केल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात बुधवारी महत्त्वपूर्ण साक्ष नोंदविण्यात आली. आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय 65) याने गुन्हा केल्यानंतर दोन ग््राामस्थांकडे गुन्ह्याची ‌‘न्यायबाह्य कबुली‌’ दिल्याची धक्कादायक माहिती साक्षीदाराने न्यायालयात दिली.

Law
Maharashtra NEP 2020 New Textbooks: बालभारतीचा मोठा निर्णय; इयत्ता 2 ते 6 ची नवी पाठ्यपुस्तके 2026-27 पासून लागू

विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात हा खटला सुरू आहे. बुधवारी एकूण सहा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. आरोपीने चिमुकलीचे अपहरण करण्यासाठी तिला गाठीशेवेचे आमिष दाखविले होते. ही गाठीशेव ज्या विक्रेत्याकडून खरेदी केली होती, त्या मिठाई विक्रेत्याची साक्ष आणि उलटतपासणी या वेळी पूर्ण करण्यात आली.

Law
Maharashtra Government Officer Transfer: महसूल विभागात मोठे फेरबदलाचे संकेत; पुणे जिल्ह्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांची तयारी अंतिम टप्प्यात

आतापर्यंत एकूण 23 साक्षीदारांची साक्ष विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी नोंदविली; तर बचाव पक्षातर्फे ॲड. हिंमतराव सूर्यवंशी यांनी उलटतपासणी घेतली. तक्रारदार पीडित कुटुंबातर्फे ॲड. मनीष पाडेकर व ॲड. मयूर दोडके यांनी काम पाहिले. आरोपीने चिमुकलीला गाठीशेव देण्याचे आणि गायीचे वासरू दाखविण्याचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले.

Law
Fertilizer Booking App: शेतकऱ्यांसाठी नवी डिजिटल क्रांती; खत बुकिंगसाठी ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ अ‍ॅप सुरू

त्या आधी आरोपीने एका मिठाई विक्रेत्याकडून गाठीशेव विकत घेतली होती. या विक्रेत्याची साक्ष व उलटतपासणी नोंदविण्यात आली. गुन्हा केल्यानंतर आरोपी पळून गेला होता. सीसीटीव्ही चित्रीकरणात आरोपी पीडित मुलीला घेऊन जाताना दिसल्याने दोन ग््राामस्थांनी मोटारसायकलवरून त्याचा शोध सुरू केला.

Law
Mumbai APMC Inquiry Order: मुंबई APMCवर मोठी चौकशी; 5 वर्षांच्या कामकाजावर 20 मुद्द्यांवर तपासाचे आदेश

त्या वेळी एका मंदिराजवळ आरोपी सापडला. त्याला जाब विचारला असता, आरोपीने चूक झाल्याचे सांगत पीडित मुलीला मारल्याची न्यायबाह्य कबुली एका ग््राामस्थाकडे दिली होती. या ग््राामस्थाची साक्ष व उलटतपासणीची प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली. याप्रकरणी आज (गुरुवारी) पुढील साक्षीदारांची साक्ष व उलट तपासणीची प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news