Baramati Crime | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; नारोळी येथील वृद्धाला सक्तमजुरी

बारामती येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय
Court Verdict
प्रातिनिधिक छायाचित्र (File Photo)
Published on
Updated on

Baramati Court Verdict Elderly Man Convicted

बारामती : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या खटल्यात कुंडलिक बाबुराव जाधव (वय ७५, रा. नारोळी, ता. बारामती) याला येथील तदर्थ जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधिश एस. एस. सस्ते यांनी २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

जाधव याने १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. त्याच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यासह अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात त्याला २० वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. दंडातील रकमेपैकी २० हजार रुपये पीडितेला नुकसान भरपाई म्हणून द्यावी. तसेच जादा नुकसान भरपाई मिळवून द्यावी, असे आदेश सस्ते यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला दिले.

Court Verdict
Sharad Pawar Defamation Case: पवारांविषयी वादग्रस्त विधानाप्रकरणी पडळकरांना दिलासा, बारामती न्यायालयाने काय निर्णय दिला?

१९ मे २०२० रोजी नारोळी येथे ही घटना घडली होती. अल्पवयीन मुलगी जाधव याच्या घरासमोरून जात असताना त्याने तिला हाक मारून घराजवळ बोलावून घेतले. घराजवळील शौचालयात नेत तेथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, तसेच कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेच्या पोटात दुखू लागल्याने दि. २४ मे २०२० रोजी तिने ही घटना चुलती व आई-वडील यांना सांगितली. त्यानंतर कुटुंबाकडून वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक आर. एन. साळुंके यांनी या गुन्ह्याचा तपास करत आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

या खटल्यात सरकार पक्षाकडून ॲड. संदीप ओहोळ यांनी काम पाहिले. त्यांनी चार साक्षीदार तपासले. पीडित मुलीने घडलेली घटना न्यायालयात सविस्तर सांगितली. तिची साक्ष विश्वसनीय असून तिच्या चुलतीची साक्ष, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष पुष्टी देणारी असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. न्यायालयाने तो ग्राह्य धरत आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षाला पोलिस उपनिरीक्षक एन. ए. नलवडे, जी. के. कस्पटे, वडगाव पोलिस ठाण्याचे हवालदार भागवत पाटील यांनी सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news