धरण उशाला अन् कोरड घशाला ! नांदेडकर पाणीटंचाईने हैराण

धरण उशाला अन् कोरड घशाला ! नांदेडकर पाणीटंचाईने हैराण
Published on
Updated on

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा :  खडकवासला धरणाशेजारी असलेल्या नांदेड गावातील नागरिक सध्या तीव्र पाणीटंचाईने हैराण झाले आहेत. ग्रामपंचायत काळातील चारही पंप जुने झाल्याने या ठिकाणी पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याचे पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे. तर महापालिकेच्या विद्युत विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिक व खडकवासला भाजपचे उपाध्यक्ष रूपेश घुले यांनी केली आहे. नांदेडची लोकसंख्या तीस हजारांपेक्षा जास्त असून, या गावाचा 2021मध्ये महापालिकेते समावेश करण्यात आला. ग्रामपंचायत काळात पाणीपुरवठ्यासाठी पुरेसे कर्मचारी होते. मात्र, महापालिकेकडे कारभार आल्यापासून कर्मचारी कमी झाले आहेत. या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी 20 ते 30 एचपीचे चार पंप आहेत. मुठा कालव्याच्या लगत असलेल्या विहिरीतून गावाला पाणीपुरवठा केला जात आहे.

[web_stories title="true" excerpt="true" author="false" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="1" order="DESC" orderby="post_date" view="list" /]

किरकटवाडी, डीएसके विश्व व नांदोशी परिसरालाही याच विहिरीतून पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याचा उपसा वाढल्याने दीड तासातच विहिरीतील पाणी कमी होत आहे. त्यातच जुन्या पंपामुळे पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नांदेडकरांना जेमतेम तासभरच पाणी मिळते. विहिरीत पाणी साठल्यानंतर पुन्हा पाणी सोडण्यात येते. गेल्या महिनाभरापासून नांदेड येथील पाण्याची समस्या गंभीर बनली. काही ठिकाणी मुबलक पाणी, तर काही भागाला पाणीच नाही. तसेच अपुरा व अनियमित पाणीपुरवठा सुरू आहे. यामुळे मजूर, कामगारांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. नांदेड गावठाण, नांदेडफाटा, जेपीनगर
आदी भागात पाणी वितरण कोलमडले आहे.

स्वतंत्र पाणी योजनेची मागणी

मुठा कालव्याच्या शेजारी नांदेड व इतर गावांची पाणीपुरवठा योजना आहे. या ठिकाणी जलशुद्धीकरण यंत्रणा नाही. मात्र, विहिरीतील पाण्याचे निर्जंतुकीकरण करून पुरवठा केला जात आहे. 1984 मध्ये बांधलेली पाण्याची टाकीचा वापर नसल्याने जीर्ण झाली आहे. चार गावांत पाण्याची मागणी वाढल्याने विहिरीतील पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळे चारही गावांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

नांदेड गावातील लोकसंख्येच्या तुलनेत पाणीपुरवठा योजना अपुरी ठरत आहे. जुन्या पंपामुळे पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होत नाही. तसेच एकाच विहिरीतून चार गावांचा पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
                                         – रूपेश घुले, उपाध्यक्ष, खडकवासला भाजप.

नांदेड गावाला पाणीपुरवठा करणारे सर्व पंप जुने झाले आहेत. त्यामुळे पुरेशा क्षमतेने पाणीपुरवठा होत नाही. याबाबत विद्युत विभागाला कळविण्यात आले आहे.
                   – हनुमंत गावडे, शाखा अभियंता, सिंहगड रोड पाणीपुरवठा विभाग.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news